Maharashtra School Reopen: कोरोना रुग्ण घटले, दिवाळी संपली, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आलेली आहे. तर, दिवाळीच्या सुट्ट्या देखील लवकरच संपणार आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागाकडून पहिलीच्या वर्गापासून सरसकट शाळा सुरु करण्यासंदर्भातील हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत

Maharashtra School Reopen: कोरोना रुग्ण घटले, दिवाळी संपली, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता
सांकेतिक फोटो


मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आलेली आहे. तर, दिवाळीच्या सुट्ट्या देखील लवकरच संपणार आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागाकडून पहिलीच्या वर्गापासून सरसकट शाळा सुरु करण्यासंदर्भातील हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. पहिलीपासून शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याच्या हालचाली

कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर शाळा बंद होत्या. राज्य सरकारनं टप्प्याटप्यानं शाळा सुरु केल्या आहेत. आता कोरोनाचं संकट दूर होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं आघाडी घेतली आहे. त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शालेय शिक्षण विभाग पहिलीपासून वर्ग सुरु करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ शकतो, असं कळतंय.

आदर्श शाळा उपक्रमाची आढावा बैठक संपन्न

राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने ‘आदर्श शाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून मंगळवारी यासंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळांच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत, असं देखील त्या म्हणाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

इतर बातम्या:

राज्य सेवा पूर्व परीक्षेचं शुल्क भरण्यासाठी शेवटची संधी, MPSC चा मोठा निर्णय

समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम?, महापालिकेची कागदपत्रे कोर्टात; वानखेडेंच्या अडचणी वाढणार

Maharashtra School Reopen Uddhav Thackeray Government likely to start classes from first to start all classes

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI