‘बलात्कारासाठी भारतीय संस्कृती जबाबदार’, इम्रान खान बरळले, वक्तव्याविरोधात पाकिस्तानमध्येही तीव्र प्रतिक्रिया

| Updated on: Apr 07, 2021 | 4:10 PM

बलात्काराच्या घटनांना अश्लिलता, पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृती जबाबदार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलंय.

बलात्कारासाठी भारतीय संस्कृती जबाबदार, इम्रान खान बरळले, वक्तव्याविरोधात पाकिस्तानमध्येही तीव्र प्रतिक्रिया
Follow us on

Pakistan PM Imran Khan on Rape Incidents इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी रविवारी (4 एप्रिल) पाकिस्तानच्या नागरिकांशी फोनवर चर्चा केली. यावेळी एका नागरिकाने त्यांना बलात्काराच्या वाढत्या घटनांवर प्रश्न विचारला. त्यावर इम्रान खान यांनी थेट अकलेचे दारे तोडले. या बलात्काराच्या घटनांना अश्लिलता, पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृती जबाबदार असल्याचं वक्तव्य खान यांनी केलं. मात्र, या वक्तव्याविरोधात पाकिस्तानमधूनच तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तसेच याचा निषेध केला जातोय. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (Human Rights Commission of Pakistan) इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर मंगळवारी आश्चर्य व्यक्त केलंय (Pakistan PM accused Indian culture for rape incidents get criticize by HRC).

मानवाधिकार आयोगाने म्हटलं, “जनतेचे नेते म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलंय ते अमान्य आहे. या वक्तव्यातून रेप का, कसे आणि कोठे होतात याबद्दलचं अज्ञान तर दिसतच आहे, सोबत यात पीडितेंना दोषी ठरवण्यात येतंय. बलात्काराचे बळी लहान मुलं देखील ठरतात हे सरकारला माहिती असायला हवं. आम्ही तात्काळ इम्रान खान यांच्या माफीची मागणी करतो. सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कटिब्धता दाखवली पाहिजे (Imran Khan on Rape Incidents).’ मानवाधिकार आयोगाशिवाय पाकिस्तानच्या नागरिकांनी देखील ट्विटरवर या प्रकरणी इम्रान खान यांना चांगलंच सुनावलं आहे.

इम्रान खान नेमकं काय म्हणालेत?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी 2 तास नागरिकांशी फोनवर चर्चा करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या दरम्यान एका नागरिकाने त्यांना सरकार बलात्कार आणि लहान मुलांच्या शोषणाच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहे असा प्रश्न विचारला. यावर इम्रान खान यांनी या घटनांबद्दल नाराजी व्यक्त करत निषेध केला. ते म्हणाले, “लैंगिक शोषण ‘अश्लीलते’मुळे होते. ही अश्लीलता पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृतीतून येते (Imran Khan on Indian Culture). यानंतर त्यांनी धर्मावर आपलं म्हणणं मांडत इस्लाम धर्मात बुरखा घालणं महत्त्वाचं असल्याचं मत व्यक्त केलं. यामुळे ‘प्रलोभनाला नियंत्रित’ करता येतं असा दावा त्यांनी केला.

सोशल मीडियावर इम्रान खान ट्रोल

इम्रान खान यांनी बलात्कारावर अशाप्रकारचं विधान केल्यानंतर सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल झाले. अनेकांनी त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्यावर त्यांना लक्ष्य केलं. वकील आणि सामाजिक कार्यकर्ता जिबरान नासिर म्हणाले, “बलात्कार हे प्रलोभनामुळे नाही तर सत्तेचं संतुलन गेल्याने होतात. जर बलात्काऱ्यांना कारवाई, जबाबदारी निश्चित होण्याचं आणि दोषी ठरवून शिक्षा होण्याची भीती वाटली तर तेही स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकतात (Imran Khan Pakistan). त्यांना केवळ ते पुरुष असल्याने यातून मोकळीक दिली तर एका नवजात लहान मुलावरही बलात्कार करु शकतात.” पाकिस्तान सरकारकडून मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये दरदिवशी 11 बलात्काराच्या घटना होतात. खरंतर वास्तविक आकडेवारी यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं सांगितलं जातं.

हेही वाचा :

Imran Khan : इम्रान खान यांची अवघ्या 24 तासांत पलटी, भारताकडून खरेदीचा ‘तो’ प्रस्ताव रद्द!

दोन दिवसापूर्वी चीनची लस टोचून घेतली, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोना

1000 रुपयांना आलं आणि 30 रुपयाला अंडे, महागाईने पाकिस्तानमध्ये उपासमारीची वेळ

व्हिडीओ पाहा :

Pakistan PM accused Indian culture for rape incidents get criticize by HRC