AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो एक निर्णय पाकिस्तानला पडतोय भारी; पाकने गुडघे टेकले, आमचं भारतासोबत बोलणं करून द्या, या देशाला शाहबाज शरीफ यांची विनंती

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं असे अनेक निर्णय घेतले ज्यामुळे पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.

तो एक निर्णय पाकिस्तानला पडतोय भारी; पाकने गुडघे टेकले, आमचं भारतासोबत बोलणं करून द्या, या देशाला शाहबाज शरीफ यांची विनंती
| Updated on: Jun 25, 2025 | 7:30 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं असे अनेक निर्णय घेतले ज्यामुळे पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर केलेली सर्वात मोठी पहिली कारवाई म्हणजे सिंधू जल वाटप कराराला दिलेली स्थगीती, त्यानंतर पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार देखील बंद करण्यात आला, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले, त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.

भारतानं सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती दिल्यामुळे आता पाकिस्तान चांगलाच अडचणीत सापडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अनेक देशांना विनंती केली आहे की, आमचं भारतासोबत बोलणं करू द्या, मात्र पाकव्यप्त काश्मीर आणि दहशतवाद हे दोन मुद्दे वगळता इतर कोणत्याही मुद्द्यांवर पाकिस्तानसोबत बोलणं होणार नसल्याची आक्रमक भूमिका भारतानं घेतली आहे.

पाकिस्तानकडून आतापर्यंत अनेक देशांना विनंती करण्यात आली आहे की, आमचं भारतासोबत बोलणं करू द्या म्हणून, आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सौदी अरेबियाला विनंती केली आहे, आमचं भारतासोबत बोलणं करून द्या असं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सौदीला म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शरीफ यांनी मंगळवारी सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांना फोन केला होता, यादरम्यान त्यांनी आमचं भारतासोबत बोलणं करून द्यावं अशी विनंती त्यांनी मोहम्मद बिन सलमान यांना केली आहे.

पाकिस्तानी रेडिओच्या वृत्तानुसार शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांना फोन केला होता, त्यावेळी त्यांनी आमचं बोलणं भारतासोबत करून द्या, अशी विनंती त्यांना केली. आम्ही पाकिस्तान, जम्मू -काश्मीर, पाणी, व्यापार आणि दहशतवाद अशा प्रत्येक विषयांवर भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सौदी अरेबियाला सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.