पाकिस्तानची वाढली धडधड, ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, आगळीक केल्यास…. कोणी दिला खणखणीत इशारा

Operation Sindoor: पाकिस्तान हा भविष्यातही भारतासाठी धोका असल्याचे सांगत माजी CDS अनिल चौहान यांनी शेजारील देशाला खणखणीत इशारा दिला आहे. पाकने आगळीक केल्यास ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

पाकिस्तानची वाढली धडधड, ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, आगळीक केल्यास.... कोणी दिला खणखणीत इशारा
ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 06, 2026 | 8:45 AM

पाकिस्तान, सौदी अरब आणि तुर्की यांच्या दरम्यान एक करार झाला आहे. त्याला एक महिना झाला आहे. त्यावर शनिवारी बोलताना माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(CDS) अनिल चौहान यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. या करारामुळे पाकिस्तानला फाजील आत्मविश्वास येऊ शकतो आणि तो पुन्हा भारताविरोधात आगळीक करू शकतो. पण ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. जशाच तसे उत्तर देण्यात येईल असे त्यांनी पाकिस्तानला ठणकावले.

पाकिस्तानचे शेपूट वाकडेच

तीन मुर्ती परिसरात आयोजित एका कार्यक्रमात भारताच्या सुरक्षेसाठी धोका आणि आव्हानं या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. पाकिस्तानकडून भारताला भविष्यातही मोठा धोका राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूर, सिंधू जलकरार रद्द करणे आणि इतर काही कठोर निर्णयामुळे पाकिस्तानच्या व्यवहारात मोठा बदल होऊ शकतो अशी आपण अपेक्षा करू शकतो.

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकने काही करारांवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये फाजील आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. यामुळे तो चुकीचे पाऊलही टाकू शकतो. भारताने पाकिस्तानविषयी नेहमी सतर्क राहणेच फायद्याचे ठरेल असे चौहान म्हणाले. त्यांनी पाकिस्तानला आगळीक केल्यास ऑपरेशन सिंदूरची आठवण करून दिली.

मक्का संयुक्त सुरक्षा करार

पाकिस्तान, सौदी अरब आणि तुर्कीने 7 ऑगस्ट रोजी मक्का संयुक्त सुरक्षा करार केला. या करारानुसार या तीनही देशांपैकी एकावरही हल्ला झाल्यास तो तीनही देशांवरील हल्ला मानल्या जाणार आहे. पश्चिम आशियातील वाढती सुरक्षा चिंता व्यक्त करत हा करार करण्यात आला आहे. चौहान हे 22 व्या ‘भारत रत्न पंडित गोविंद बल्लभ पंत मेमोरियल लेक्चर’ या कार्यक्रमात व्याख्यान देत होते.

पाकिस्तान भविष्यातही भारतासाठी धोका निर्माण करू शकतो. तो देशाच्या सुरक्षेला कायम धोका असू शको. गेल्या वर्षी मे महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. जर पाकिस्तानने आगळीक केली तर ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. त्यामुळे आपल्या तीनही संरक्षण दलांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us