
पाकिस्तानातील जकोबाबादजवळ रेल्वे ट्रॅकवर मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट हायजॅक झालेल्या जाफर एक्सप्रेसमध्ये झाला. स्फोटानंतर एक्सप्रेसचे 6 डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन पेशावरहून क्वेटाला जात होती. पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकवर तीन फूट रुंद खड्डा पडला आणि सुमारे सहा फूट लांबीचे रेल्वे ट्रॅक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. रेल्वे आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत आहेत.
समा टीव्हीच्या मते, स्फोट इतका जबरदस्त होता की डब्यांचे चाक रुळावरून उखडले आणि ट्रेन अचानक थांबली. प्राथमिक अहवालांनुसार, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत, तरीही अद्याप कोणत्याही मृत्यूची पुष्टी झालेली नाही. बचाव आणि मदत पथके तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.
वाचा: मोठी अपडेट! इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या मुख्यालयावर इराणचा हल्ला
An explosion occurred on the railway track near Jacobabad, Balochistan province causing four coaches of the Jaffar Express to derail. The train was en route from Peshawar to Quetta. According to police, the blast left a 3-foot-wide crater on the track, and around 6 feet of the… pic.twitter.com/ltXbrEUwdt
— Abdullah Jan Sabir (@AbdullahJanSab1) June 18, 2025
या मार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
जकोबाबादजवळ जाफर एक्सप्रेसवर झालेल्या स्फोटाने या मार्गाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही ट्रेन यापूर्वीही अनेकदा हल्ल्यांचा बळी ठरली आहे. बलुचिस्तानमधील रेल्वे प्रवास असुरक्षित मानला जातो. हा प्रदेश बराच काळ फुटीरतावाद, हिंसाचार आणि लष्कराविरुद्ध बंडखोरीने त्रस्त आहे.
मार्च 2025 मध्ये BLA ने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते
याच वर्षी मार्चमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. त्या वेळी ट्रेनमध्ये सुमारे 350 प्रवासी होते. पाकिस्तानी लष्कराने मोठ्या कठिणाईने ऑपरेशन राबवून ट्रेन सोडवली, परंतु BLA ने दावा केला की त्यांनी 100 हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. मात्र, पाकिस्तान लष्कराने 35 सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली होती.