
अमेरिका,इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धात पाकिस्तान सध्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानला मध्य पूर्वेतील हे मोठं युद्ध थांबवण्याचं श्रेय हवं आहे. पाकिस्तान सरकार आणि सैन्याचे अधिकारी इराण तसचं दुसऱ्या पक्षांशी संपर्क साधून शांतता स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान इथे मध्यस्थीच्या मागे लागलेला असताना त्यांना दुसरीकडून मोठा दणका बसला आहे. अफगाणिस्तानात सत्तेत बसलेल्या तालिबानने पाकिस्तान सीमेवरील तीन पोस्ट उद्धवस्त केल्या आहेत. ही घटना पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. पाकिस्तानचं आपल्या स्वत:च्या सीमेवर नियंत्रण नसल्याचं हे उत्तम उदहारण आहे.
पाकिस्तानचा इराण युद्धात स्वत:ला मध्यस्थ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्याचे अधिकारी इराणच्या संपर्कात आहेत. दोन्ही बाजूंना चर्चेसाठी तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या युद्धात शांती दूत बनलो तर आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारेल तसच क्षेत्रीय प्रभाव वाढेल असं पाकिस्तानच म्हणणं आहे. सौदी अरेबिया आणि अमेरिकेसोबतच संबंध लक्षात घेता पाकिस्तानला असं वाटतय की तो दोन्ही बाजू बॅलन्स करु शकतो. पण या सगळ्यात त्यांना मध्येच तालिबानने झटका दिला आहे.
पोस्ट पूर्णपणे नष्ट
तालिबानने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील तीन पाकिस्तानी सैन्य चौक्या पूर्णपणे नष्ट केल्या. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या आत घुसून हल्ले केले होते. म्हणून आम्ही प्रत्युत्तर दिलं असं तालिबानीचं म्हणणं आहे. पाकिस्तानी सैन्याने याला तालिबानची घुसखोरी आणि दहशतवादी हल्ला म्हटलं आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिकांचं नुकसान झालं आहे. पोस्ट पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. पाकिस्तान इराण युद्धात मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली आहे.
पुन्हा एकदा वातावरण बिघडू शकतं
पाकिस्तान आणि तालिबानमध्ये अनेक वर्षांपासून तणाव आहे. तालिबानने TTP च्या दहशतवाद्यांना आश्रय दिलाय हा पाकिस्तानचा मुख्य आरोप आहे. TTP कडून पाकिस्तानात हल्ले केले जातात. म्हणूनच पाकिस्तानने अफगाणिस्तानात अनेक एअर स्ट्राइक केले. तालिबानने या हल्ल्यांना पाकिस्तानची आक्रमकता ठरवलं आहे. तालिबानच्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा वातावरण बिघडू शकतं.
स्वत:ची सीमा संभाळता येत नाही
मध्य पूर्वेतील युद्धात पाकिस्तान जाहीरपणे कोणाची बाजू घेत नाहीय. सौदी अरेबिया आणि अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेऊन असलेला पाकिस्तान इराणशी सुद्धा चर्चा करत आहे. तालिबानच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानला स्वत:ची सीमा संभाळता येत नाही, तो मध्यस्थी काय करणार? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.