AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran US War Update : इराण युद्ध कधी संपणार? जगाला संकटात टाकणाऱ्या प्रश्नावर अखेर व्हाइट हाऊसने दिलं ठोस उत्तर

Iran US War Update : मध्य पूर्वेत सुरु असलेलं इराण विरुद्ध युद्ध कधी संपणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण या युद्धामुळे अनेक देशात भयंकर ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतोय. महागाई वाढतेय. या प्रश्नावर अखेर व्हाइट हाऊसकडून ठोस उत्तर मिळालं आहे.

Iran US War Update :  इराण युद्ध कधी संपणार? जगाला संकटात टाकणाऱ्या प्रश्नावर अखेर व्हाइट हाऊसने दिलं ठोस उत्तर
Donald Trump
| Updated on: Mar 26, 2026 | 9:45 AM
Share

मध्य पूर्वेत अमेरिका-इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाला 26 दिवस झाले आहेत. या युद्धाचा ज्वर कमी होण्याऐवजी उलट दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इराण युद्धासंदर्भात व्हाइट हाऊसच्या सचिव कॅरोलिन लेविट यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. इराण हे युद्ध हरतोय आणि त्यांची 9 हजारपेक्षा जास्त ठिकाणं अमेरिकी हल्ल्यात नष्ट झाली आहेत. तेच अमेरिकी राष्ट्र्ध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलय की, इराणी नेत्यांना डील करायची आहे. पण ते मोकळेपणाने बोलायला घाबरतायत. आम्ही त्यांना मारुन टाकू ही त्यांच्या मनात भिती आहे. कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, “इराणमध्ये अमेरिकेची कारवाई सुरु आहे. अमेरिकेने आतापर्यंत इराणवर 5 हजार पाऊंडचे बॉम्ब टाकले आहेत. युद्ध कधीपर्यंत चालणार? या प्रश्नावर कॅरोलविना यांनी मिशन पूर्ण व्हायला अजून 4 ते 6 आठवड्यांचा कालावधी लागेल” असं म्हटलं आहे.

राष्ट्रपती ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. “इराणने पराभव मान्य केला नाही तर अजून भीषण प्रहार होईल. आम्ही आतापर्यंत 8 युद्ध जिंकली आहेत. लोक अनेकदा हे विसरतात. आम्ही अजून एक युद्ध जिंकतोय. इराण शांतता करार करण्यासाठी आतुर आहे. पण त्यांना हे मान्य करायचं नाहीय. इराणला भिती ही आहे की, अमेरिका संपवून टाकेल. इराणने आम्हाला कमी लेखण्याची चूक करु नये. इराणी नेतृत्वाचा आधीच पराभव झाला आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. इराणने मात्र ट्रम्प यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत. युद्धासाठी आम्ही तयार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सीजफायर आणि ट्रम्प यांच्या चर्चेच्या दाव्यांना फोल ठरवलं.

नेमकं खरं कोण बोलतय?

“राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि आमच्या सैन्याच्या अंदाजानुसार हे महत्वाचं मिशन पूर्ण करण्यासाठी 4 ते 6 आठवडे लागतील असा आमचा अंदाज होता. 25 दिवस झाले असून जगातील शक्तीशाली सैन्य आपल्या निर्धारिक वेळेपेक्षा पुढे चाललं आहे. इराणच्या सत्तेला आता युद्धातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी ते मार्ग शोधतायत. त्यांना कळून चुकलय की ते मार खातायत. अमेरिका आणि मित्र सैन्यावर हल्ला करण्याची त्यांची क्षमता आणि आपल्या क्षेत्राच संरक्षण करण्याची त्यांची क्षमता प्रत्येक तासागणिक कमी होत चालली आहे” असं व्हाइट हाऊसच्या अधिकारी कॅरोलिन लेविट म्हणाल्या. ट्रम्प म्हणतोय इराण चर्चा करतोय. इराण हा दावा नाकारतोय. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय हा प्रश्न निर्माण होतो.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?