
Pakistan Critrizes Afghanistn : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. दोन्ही देशांतील व्यापार, प्रवास सध्या बंद आहे. युद्धात अनेकवेळा पराभव स्वीकारावा लागलेला असला तरी पाकिस्तानच्या कुरापती चालूच असतात. भारतासोबत मैत्री असलेल्या प्रत्येक देशावर पाकिस्तान टीका करत असतो. सध्या अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अधिकृतपणे भारताच्या दौऱ्यावर आहेत. असे असतानाच आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अत्यंत मोठे विधान लागले आहे. त्यांनी फगाणिस्तावर सडकून टीका केली आहे.
ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अफगाणीस्तानवर भाष्य केले. या मुलाखतीत अफगाणिस्तान हा देश नेहमीच भारताशी प्रामाणिक राहिलेला आहे, असे विधान केले. तसेच आपण अफगाणी नागरिकांना आश्रय देऊन मोठी चुक केली, असेही विधान त्यांनी केले आहे. अफगाण नागरिकांना आश्रय देण्याचा निर्णय हा अमेरिकेच्या दबावाखाली गेण्यात आला होता. आपण लाखो अफगाणिस्तानी नागरिकांना आश्रय दिला, पण त्यांनी कधीच पाकिस्तानच्या हिताचा विचार केला नाही. आजदेखील अफगाणिस्तान भारताच्याच बाजूने उभा राहतो, अशी आगपाखड आसिफ यांनी केली.
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुक्तारी सध्या अधिकतपणे भारताच्या दौऱ्यावर आहेत. ते 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत भारतात असतील. आमीर खान यांचा हा दौरा भारत-अफगाणिस्तान यांच्यातील संवाद आणि राजनैतिक संबंधांसाठी फार महत्त्वाचा मानला जात आहे. एकीकडे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधात सुधारणा होत असतानाच ख्वाजा आसीफ यांनी अफगाणिस्तानविरोधात विधानं केली आहेत. आता ख्वाजा यांच्या या विधानांमुंळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
एका रिपोर्टनुसार पाकिस्तानातील विविध राज्यांत एकूण 29 लाख अफगाणी नागरिक राहतात. यातील साधारण 13 लाख नागरिक नोंदणीकृत आहेत. पाकिस्तानात अफगाणी नागरिकांची स्थिती फारच दयनीय मानली जाते. असे असताना आताी ख्वाजा यांनी केलेल्या विधानामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.