Big News: धक्कादायक ! 18 वर्षाच्या मुलीसोबत तिसरं लग्न करणाऱ्या 49 वर्षाच्या पाकिस्तानी खासदाराचा गुढ मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर लियाकत नुकताच त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट आणि तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले होते

Big News: धक्कादायक ! 18 वर्षाच्या मुलीसोबत तिसरं लग्न करणाऱ्या 49 वर्षाच्या पाकिस्तानी खासदाराचा गुढ मृत्यू, नेमकं काय घडलं?
पाकिस्तानी खासदार अमीर लियाकतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 3:54 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानी खासदार अमीर लियाकत (Pakistani MP Amir Liaquat) यांचे कराचीत निधन झाले. जिओ टीव्हीने ही बातमी दिली आहे. कराचीतील त्याच्या अपार्टमेंटमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. आमिर लियाकत नुकताच त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट आणि तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले होते. आमिर लियाकतचे वय अवघे 49 वर्षे होते. त्यांचा जन्म 1972 मध्ये कराचीमध्ये झाला. आमिर लियाकतने तीन विवाह केले होते. त्याने 2018 मध्ये तौबा अन्वरसोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर तिच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याने 2022 मध्येच 31 वर्षांनी लहान असलेल्या दानिया शाहसोबत (Dania Shah) लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच 18 वर्षीय दानियाने त्याच्याकडे घटस्फोट मागितला होता.

रात्रीपासून त्यांची प्रकृतीत बिघाड

जिओ न्यूजने नोकराच्या हवाल्याने सांगितले की, बुधवारी रात्रीपासून त्यांची प्रकृतीत बिघाड झाला होता. मात्र त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. यानंतर अमीर वेदनेने ओरड्याने नोकराने तिकडे धाव घेतली. पण दरवाजा बंद होता. दरवाजा तोडला असता ते खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.

खासदार म्हणून ही निवडून आले

आमिर लियाकत मार्च 2018 मध्ये इम्रान खानच्या पक्ष पीटीआयमध्ये सामील झाले होते. यानंतर ते कराचीमधून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, नंतर त्यांनी पक्षाचा राजीनामाही दिला होता. पीटीआयमध्ये येण्यापूर्वी ते मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट (MQM) चे मोठे नेते होते. पण ऑगस्ट 2016 मध्ये त्यांनी पक्षापासून फारकत घेतली. त्यावेळी त्यांनी राजकारण सोडत असल्याची घोषणा केली होती. पण 2018 मध्ये, ते केवळ इम्रान खानच्या पीटीआय पक्षात सामील झाले नाही तर कराचीमधून खासदार म्हणून ही निवडून आले होते.

हे सुद्धा वाचा

लियाकत दीर्घकाळ मीडिया इंडस्ट्रीशी संबंधित होते. 2001 मध्ये त्यांनी Jio TV जॉईन केली होती. यानंतर ते बोल न्यूजवरही दिसले होते. लियाकत हे शेवटचे बोल हाऊस कार्यक्रमात दिसले होते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.