AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमा हैदरची आता सीमा ठाकूर झाली, सचिनसाठी सीमा आपला धर्म बदलून हिंदू झाली

सीमा आणि सचिन यांच्या लव्ह स्टोरीने आता पाकिस्तान आणि भारतात मिडीयात चर्चेला उधाण आले आहे. सीमा आणि तिचा प्रियकर सचिनला सर्वजण भेटू इच्छीत आहेत.

सीमा हैदरची आता सीमा ठाकूर झाली, सचिनसाठी सीमा आपला धर्म बदलून हिंदू झाली
seema haiderImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 12, 2023 | 9:15 PM
Share

नवी दिल्ली : सध्या भारत आणि पाकिस्तानात सीमा हैदर आणि सचिन यांच्या  ( Seema-Sachin Love Story ) अनोख्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु आहे. आपल्या नवऱ्याला सोडून पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर ( Seema Haider ) हीने आता भारतातच आपले प्राण जावे असे म्हटले आहे. आपले नाव तिने बदलून ठाकूर असे केले आहे. तसेच आपला आणि मुलांचा धर्मही तिने बदलून त्यांना हिंदू केले आहे. पब्जी गेममुळे ( PUBG )  आपले सचिनशी सुत जुळले आहे. आता आपल्या पुन्हा पाकिस्ताना जायचे नाही. मला आणि माझ्या मुलांना पाकिस्तान पाठवू नका अशी विनंती तिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांना केले आहे.

सीमा आणि सचिन यांच्या लव्ह स्टोरीने आता पाकिस्तान आणि भारतात मिडीयात चर्चेला उधाण आले आहे. सीमाने मिडीयाशी बोलताना सांगितले की आता मी ठकुराईन झाली आहे. माझे नाव सीमा सचिन ठाकूर आहे. पब्जी आमच्या जीवनात लवजी बनून आला आहे. त्याच्यामुळे मला सचिन सारखा प्रेमळ पती मिळाला आहे. अन्यथा पाकिस्तानात गुलामने माझे जीवनाला अगदी नर्क केले होते. आता मला भांगेत सिंदूर भरायला आवडते. मंगळसूत्र घालायला खूप आवडते. हे सर्व सचिनसाठी करायला मला खूपच आवडते.

पाकिस्तानात गेले तर छळ करुन मारतील 

सीमा जेव्हा पासून पाकिस्तानातून पळून आली तेव्हापासून तिला भेटायला अनेक लोक तिच्या घरी येत आहेत. सीमा आणि तिचा प्रियकर सचिनला सर्वजण भेटू इच्छीत आहेत. यावेळी तिने पाकिस्तानात न जाण्याची कारणे देखील सांगितली आहेत. एक म्हणजे तिला सचिनपासून वेगळे व्हायचे नाही. ती त्यांना आपला पती मानत आहे. आणि उर्वरित आयुष्य त्याची पत्नी बनूनच आयुष्य काढायचे असे तिने ठरविले आहे. सीमाने म्हटले आहे की जर तिला आता पाकिस्तानात पाठविले तर तिला नॉर्मल नव्हे तर भयानक मृत्यू दिला जाईल.

सचिनबरोबर आनंदी आहे

सीमा पुढे म्हणाली की आधी आपला एक पाय कापला जाईल. नंतर दुसरा पाय कापला जाईल. त्यानंतर एक हात कापला जाईल नंतर दुसरा हात कापला जाईल. अशा प्रकारे छळून करुन मला मारले जाईल असेही ती म्हणाली. मला असा मृत्यू नको मला भारताच कायम रहायचे आहे. पाकिस्तान ऐवजी मला भारतातच मृत्यू आला तर चांगले होईल असे तिचे म्हणणे आहे. भारतात येऊन मला मोकळा श्वास घ्यायला मिळत आहे. माझा पाकिस्तानी पती मला खूप त्रास द्यायचा, तर भारतात सचिन तिला प्राणापलिकडे प्रेम करीत आहे. मी सचिनबरोबर आनंदी आहे असे सीमा हीने म्हटले आहे. सीमाने गुलाम हैदर बरोबर साल 2014 मध्ये लव्ह मॅरेज केले होते.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.