मुलींची इज्जत लुटायचा अन् मारायचा, 350 लोकांचा घेतला जीव, स्वत:ला देव समजणाऱ्या सैतानाचं हादरवून टाकणारं पाप!

Pedro Lopez Worlds Biggest Serial Killer: आज आपण जगातील सर्वात निर्दयी गुन्हेगाराची माहिती जाणून घेणार आहोत. या व्यक्तीने तब्बल 350 लोकांची हत्या केली होती. याचे नाव पेड्रो लोपेझ असं आहे. तो जगाच्या इतिहासातील सर्वात खतरनाक सिरीयल किलर मानला जातो.

मुलींची इज्जत लुटायचा अन् मारायचा, 350 लोकांचा घेतला जीव, स्वत:ला देव समजणाऱ्या सैतानाचं हादरवून टाकणारं पाप!
Pedro Lopez
| Updated on: Oct 31, 2025 | 10:52 PM

तुम्ही आतापर्यंत अनेक गुन्हेगारांच्या कथा ऐकल्या असतील, मात्र आज आपण जगातील सर्वात निर्दयी गुन्हेगाराची माहिती जाणून घेणार आहोत. या व्यक्तीने तब्बल 350 लोकांची हत्या केली होती. याचे नाव पेड्रो लोपेझ असं आहे. तो जगाच्या इतिहासातील सर्वात खतरनाक सिरीयल किलर मानला जातो. त्याच्या निशाण्यावर लहान मुली असायच्या, तसेच त्याने इतरही 350 लोकांची हत्या केल्याचे समोर आले आहे. पेड्रो लोपेझबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पेड्रो लोपेझ हा जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा सिरीयल किलर माले जाते. त्याने काही काही वर्षांत 350 लोकांचा जीव घेतला होता. यात सर्वाधिक 7 ते 12 वयोगटातील मुलींचा समावेश होता. तो निष्पाप आणि गरीब मुलींना निर्जन ठिकाणी न्यायचा आणि त्यांची इज्जत लुटायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा. पे़ड्रोने एका मुलाखतीत दर आठवड्याला तीन मुलींवर बलात्कार आणि हत्या केल्याची कबुली दिली होते. 1980 मध्ये 110 लोकांच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर त्याने 350 लोकांची हत्या केल्याचे कबूल केले होते.

पेड्रो कसा बनला सिरीयल किलर?

समोर आलेल्या माहितीनुसार, लोपेझला कार चोरीच्या आरोपात 1969 मध्ये अटक करण्यात आली होती, त्यावेळी तुरुंगातील 4 गुन्हेगारांनी त्याचे शारीरिक शोषण केले. त्याने या चौघांचीही हत्या केली. येथूनच त्याची कहाणी सुरू झाली. शिक्षा संपल्यानंतर तो तो बाहेर आला तेव्हा त्याने अनेकांचा जीव घेतला.

स्वतःला देव मानायचा

पेड्रो हा हत्या करण्यासाठी खास योजना आखायचा. तो रस्ता चुकलेल्या सेल्समनचे नाटक करायचा. नंतर तो मुलांना आमिष दाखवून दूर न्यायचा आणि त्यांचे अपहरण आणि बलात्कार करत खून करायचा. खून केल्यानंतर तो त्यांचा मृतदेह पुरायचा. असे दुष्कर्म केल्यानंतर त्याला असे वाटायचे की तो मुलींना त्यांच्या गरिबीतून मुक्त करत आहे. तो या मुलींना बाहुल्या म्हणायचा आणि त्यांना वाचवल्याबद्दल स्वतःला देव मानायचा.

पेड्रो लोपेझ कसा सापडला?

पेड्रो लोपेझने 1980 मध्ये एका मुलीवर बलात्कार केला, त्यावेळी त्याला आदिवासींनी पकडले. मिशनऱ्यांनी त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर खटला चालवला गेला, यात तो दोषी आढळता आणि मानसिकदृष्ट्या वेडा असल्याचेही समोर आले. त्याला 16 वर्षांसाठी पागलखान्यात पाठवण्यात आले. त्यानंतर 1998 मध्ये तो तुरुंगातून सुटला. त्यानंतर तो फरार झाला. 2002 मध्ये पेड्रोवर पुन्हा खुनाचा आरोप लावण्यात आला, मात्र तो सापडला नाही. तेव्हापासून तो बेपत्ता आहे.