Hindu Population: या मुस्लिम देशात हिंदू होणार दुप्पट, त्या अहवालाने सर्वांनाच मोठा धक्का
Hindu Population Double: जागतिक स्तरावर विविध धार्मिक गटांची लोकसंख्या किती वाढणार याविषयीचा एक अहवाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानुसार, मुस्लिम लोकसंख्या जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. पण त्याचवेळी हिंदूविषयी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. काय आहे तो दावा?

Hindu Population Double: जगभरातच नाही तर भारतातही सध्या प्रसिद्ध संशोधन संस्था प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Centre) ताज्या अहवालाची खास चर्चा आहे. त्यानुसार जगातील विविध धार्मिक गटांच्या लोकसंख्येत मोठा बदल होऊ शकतो. या अहवालातील अंदाजानुसार, 2025 पर्यंत जगात इस्लाम धर्माचे पालन करणार्यांची संख्या ख्रिश्चन धर्मियांपेक्षा वाढणार आहे. 2020 मध्ये जगात सुमारे 227 कोटी ख्रिश्चन आणि 220 कोटी मुस्लिम होते. नव्या दाव्यानुसार, 2035 पर्यंत जागतिक मुस्लिम लोकसंख्या 257 कोटींपर्यंत पोहचू शकते. तर ख्रिश्चनांची संख्या 252 कोटी इतकी असेल. असाच कल कायम राहिला, तर 2070 पर्यंत जगात मुस्लिमांची लोकसंख्या 360 कोटींचा टप्पा ओलंडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी हिंदूविषयी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. काय आहे तो दावा?
पाकिस्तानबाबत अहवालात काय मत?
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, 2020 मध्ये पाकिस्तानातील हिंदू लोकसंख्या जवळपास 50.3 लाख इतकी होती. जी येत्या 44 वर्षात म्हणजे 2070 पर्यंत वाढून 1.03 कोटी होईल. नैसर्गिक लोकसंख्या वाढ आणि मृत्यू दरापेक्षा जन्म दराचे अधिक प्रमाण हे यामागील कारण असू शकेल असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. भारतापेक्षा जिथे हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे, अशा देशांमध्ये पाकिस्तानमधील हिंदूची लोकसंख्या वाढीचा वेग लक्षणीय असू शकतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
जागतिक स्तरावर हिंदू लोकसंख्येची काय स्थिती?
Pew Research Centre च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर हिंदूंच्या लोकसंख्या वाढीचा वेग मंदावणार आहे. जगभरातील हिंदूंची एकूण लोकसंख्या 2020 मध्ये 1.2 अब्ज इतकी होती. इतर धर्मियांच्या लोकसंख्येचा वेग पाहता हिंदूंची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. अहवालातील दाव्यानुसार 2070 पर्यंत ही संख्या 1.4 अब्ज इतकीच वाढणार आहे. असे असले तरी भारतात हिंदू हे बहुसंख्य असतील. हिंदू लोकसंख्येत या कालावधीत जवळपास 17.6 कोटींची भर पडण्याचा अंदाज आहे. तर स्थलांतरामुळे अमेरिकेतही हिंदूंची संख्या वाढणार आहे. अमेरिका जगातील पाचव्या क्रमाकांचा मोठा हिंदू लोकसंख्या असलेला देश ठरू शकतो. येत्या काही काळात हा बदल दिसण्याची शक्यता या संस्थेने अहवालात नमूद केली आहे.