AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pilot Died in Plane | विमान हवेत असताच पायलटचा मृत्यू, प्रवाशांच्या जीव आला मुठीत

Pilot Dies In Bathroom On Flight | विमानाने उड्डाण केल्यानंतर काही तासात वैमानिकाला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर वैमानिकाचा विमानातच दुर्दैवी मृत्यू झाला.

Pilot Died in Plane | विमान हवेत असताच पायलटचा मृत्यू, प्रवाशांच्या जीव आला मुठीत
| Updated on: Aug 17, 2023 | 12:24 PM
Share

Pilot Died in plane | विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. 271 प्रवाशांसह मियामीहून चिलीला जाणाऱ्या व्यावसायिक विमानाच्या बाथरूममध्ये पडल्याने पायलटचा मृत्यू झाला. रविवारी रात्री पनामामध्ये यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सहवैमानिकाने केले हे लँडिंग केले. LATAM एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर तीन तासानंतर ही घटना घडली. बाथरुममध्ये पडल्याने वैमानिकाचा मृत्यू झाला. पायलटचे नाव कॅप्टन इव्हान अंदौर असे आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने क्रूने त्यांना आपत्कालीन उपचार दिले परंतु ते त्यांना वाचवू शकले नाहीत.

विमान पनामा सिटीच्या टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. वैद्यकीय तज्ञ वैमानिकाचे प्राण वाचवण्यासाठी धावले पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. अंदौर यांना 25 वर्षांचा अनुभव होता.

LATAM एअरलाइन्स ग्रुपने आपल्या निवेदनात म्हटले की, मियामी-सॅंटियागो मार्गावर असलेल्या फ्लाइट LA505 वैद्यकीय आणीबाणीमुळे पनामामधील टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. विमान उतरले तेव्हा, आपत्कालीन सेवांनी जीवन वाचवणारी मदत दिली, परंतु पायलटचे दुर्दैवाने निधन झाले,”

“जे घडले त्यामुळे आम्ही खूप दु:खी असून आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.