PM मोदींनी भारताला नव्या उंचीवर पोहचवलं, पण त्यांनाच कमजोर करण्याचा कट, माजी राष्ट्राध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट

जून महिन्यात, सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल मोदींचे अभिनंदन करणाऱ्या पहिल्या नेत्यांमध्ये सर्बियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा समावेश होता.

PM मोदींनी भारताला नव्या उंचीवर पोहचवलं, पण त्यांनाच कमजोर करण्याचा कट, माजी राष्ट्राध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट
The former president of Serbia And PM Modi
| Updated on: Oct 07, 2026 | 9:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सरकारचे नेतृत्व केल्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे केंद्रिय मंत्रीमंडळाने काल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला. पंडित नेहरु यांच्या नंतर नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्याचे म्हटले जाते. आता सर्बियाचे माजी राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला नव्या उंचीवर नेले आहे. आणि जागतिक व्यासपीठावर भारत एक नवीन ताकद म्हणून पुढे आला आहे. तरीही त्यांना खाली पाडण्यचा प्रयत्न केला जात आहे. बुधवारी वुसिक यांची एका पॉडकास्टमधील एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी हा खुलासा केला आहे.

राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांनी गेल्या महिन्यात संसदीय निवडणूक लढण्यासाठी सर्बियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावेळी त्यांनी नेत्यांना कमजोर करण्याच्या जागतिक प्रवृत्तीकडे इशारा केला आहे. पीएम मोदी यांचा खास उल्लेख करेत वुसिक यांनी म्हटलंय की त्यांनी भारताला एक मोठी जागतिक ताकद बनवले. आणि खूप मोठी कामे केली.

Loading...

‘पीएम मोदींना कमजोर करण्याचा प्रयत्न’

वुसिक यांनी म्हटलंय की तुमच्या जवळ नरेंद्र मोदी सारखा नेता आहे. आता त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पीएम मोदींना भारताला नव्या उंचीवर पोहचवले आहे. ते महात्मा गांधी यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा प्रयत्न करत असतात.

ते पुढे म्हणाले की,’ त्यांच्यामुळे भारत जगाच्या व्यासपीठावर इतका महत्वाचा बनला आहे. एक मोठी ताकद बनला आहे. त्यांनी खूप शानदार काम केले आहे. तरीही लोक त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतात, ते अपयशी ठरावेत यासाठी काय-काय करतात. हा एक पॅटर्न बनला आहे. ‘ मात्र, वुसिक यांनी या संदर्भात विस्ताराने सांगितले नाही की पीएम मोदी यांना कोण पाडण्याचा प्रयत्नात कोण सामील होते ? त्यांना कथितपणे कमजोर करण्याचा कोण प्रयत्न करत होते.

भाजपाने सर्बियाचे माजी राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यांना त्वरीत उचलले आणि त्यांना पीएम मोदीच्या नेतृत्वाच्या समर्थनासाठी सादर केले आहे.  भाजपाने ट्वीट केले की, जगातील नेते आपल्या पंतप्रधानांबद्दल असे कौतूक करत आहेत, तर सर्वकाही स्वच्छ आहे. पीएम मोदी याच्या नेतृत्वाखाली भारत पुढे जात आहे आणि जगाची त्याकडे नजर आहे.

भाजपा नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी त्यात आणखीन भर टाकली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजू वर्मा यांनी ट्विट केले आहे की सर्बियाचे राष्ट्राध्यक्षांनी अस्थिरता निर्माण करणे आणि भारताच्या मतदारांद्वारे पीएम मोदींना दिलेल्या जनादेशाला कमजोर करण्याच्या प्रयत्नांबाबत बोलले आहे.

याआधीच्या दिवशी माजी राष्ट्राध्यक्ष वुसिक यांनी एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. वुसिक आधीही भारत आणि सर्बियाचे नाते आणि मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतूक केले आहे. ते म्हणाले की खूप कमी लोक म्हणू शकतील की त्यांनी देशाच्या सेवेत पंचवीस वर्षे समर्पित केली आहेत. आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून.’वुसिक पुढे म्हणाले की मी जाणतो की तुम्ही भारत आणि त्याच्या भविष्याची किती काळजी करता आणि जग पाहू शकते की तुम्ही भारताला किती उंचीवर नेले आहे.

सार्वजनिक सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान काय म्हणाले?

दरम्यान, बुधवारी सकाळी , पंतप्रधानांनी भारतीयांना ‘आपण हे करून दाखवू’ अशी वृत्ती अंगीकारण्याचे आवाहन केले आणि ‘विकसित भारता’साठीच्या आपल्या आवाहनाचा त्यांनी पुनरुच्चार केला.२००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या सुरू झालेल्या सार्वजनिक राजकीय जीवनातील २५ वर्षांच्या प्रवासाचा आनंद साजरा करताना पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us