G20 Summit: पंतप्रधान मोदी रोममध्ये कोणकोणत्या जागतिक नेत्यांना भेटले? काय होते मुद्दे?

| Updated on: Oct 31, 2021 | 3:45 PM

शनिवारी पहिले सत्रासात पंतप्रधान मोदी कोविड-19 विरुद्धच्या लढाईत भारताच्या योगदानावर बोल्ले  आणि 150 हून अधिक देशांना भारताने वैद्यकीय पुरवठा केला आहे याचा उल्लेख केला.  मोदींनी G20 देशांना भारताला आर्थिक पुनर्प्राप्ती (Economic Recovery) आणि पुरवठा साखळी विविधीकरणात (Supply Chain diversification) भागीदार बनवण्यासाठी आमंत्रित केले.

G20 Summit: पंतप्रधान मोदी रोममध्ये कोणकोणत्या जागतिक नेत्यांना भेटले? काय होते मुद्दे?
PM Modi with world leaders in G20 Summit
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 देशांच्या 16 व्या शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. मोदी हे पहिल्या सत्रासाठी 29 ते 30 ऑक्टोबर दरम्यान रोममध्ये आणि दुसऱ्या सत्रासाठी 1 आणि 2 नोव्हेंबरला ब्रिटनमध्ये असतील. शनिवारी पहिल्या सत्राात पंतप्रधान मोदी कोविड-19 विरुद्धाच्या लढाईत भारताच्या योगदानावर बोल्ले आणि 150 हून अधिक देशांना भारताने वैद्यकीय पुरवठा केला आहे याचा उल्लेख केला. मोदींनी G20 देशांना भारताला आर्थिक पुनर्प्राप्ती (Economic Recovery) आणि पुरवठा साखळी विविधीकरणात (Supply Chain diversification) भागीदार बनवण्यासाठी आमंत्रित केले. महामारीच्या आव्हानांना मात करून, पुरवठा साखळींच्या संदर्भात भारत एक विश्वासू भागीदार आहे, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले. जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य (Global Economy and Global Health) या विषयावरील सत्रात पंतप्रधान मोदी इतर जागतिक नेत्यांसोबत सहभागी झाले. (PM Modi meets world leaders in G20 Summit discusses issues)


पंतप्रधानांनी ट्विटरवर G20 शिखर परिषदेच्या भेटीेचे फोटो शेअर केले. मोदींनी जर्मन चांसलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांसारखे इतर प्रमुख जागतिक नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांशी मोदींनी परस्पर आणि जागतिक हितसंबंधांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

शनिवारी पंतप्रधान मोदींने व्हॅटिकनमध्ये रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिसची भेट घेतली आणि त्यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं. पोप फ्रान्सिस यांनी पंतप्रधान मोदींचे निमंत्रण स्वीकारले असून भारत भेटीसाठी उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात 20 मिनिटांची बैठक सुमारे तासभर चालली, असं परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचे स्वागत केले आणि म्हटले या भेटीमुळे देशाची प्रतिष्ठा वाढते आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो कारण आमचा ‘वसुधैव कुटुंबकम’ वर विश्वास आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, असे संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे म्हणाले.  व्हॅटिकन न्यूजनुसार, पंतप्रधानांनी पोप फ्रान्सिस यांना खास बनवलेला चांदीची मेणबत्ती आणि ‘द क्लायमेट क्लाइंब: इंडियाज स्ट्रॅटेजी, अॅक्शन्स अ‍ॅण्ड अ‍ॅव्हिचमेंट्स’ हे पुस्तक भेट दिले.

Related News

VIDEO: नाव काय तुमचं?, इथे काय करता?, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीत भर गर्दीत साधला चक्क मराठी माणसाशी संवाद

G20 Summit: पंतप्रधान मोदी आज ब्रिटनला रवाना होणार; काय आहे परिषदेचा अजेंडा?

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता