
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्या सोबत बैठक घेणार आहेत. जपानच्या या अधिकृत दौऱ्यादरम्यान पीएम मोदी यांना जपानने गार्ड ऑफ ऑनर दिला आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास भेट म्हणून दारुमा बाहुली ( Daruma Doll ) देण्यात आली आहे.
दारुम जी मंदिराचे मुख्य पुजारी रेवरेंड सेशी हिरोसे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दारुमा बाहुली भेट दिली आहे. दारुमा जपानचे एक प्रतिष्ठीत सांस्कृतिक प्रतिक आणि स्मृतीचिन्ह आहे. यास झेन बौद्ध धर्माचे संस्थापक बोधीधर्माच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. या बाहुलीला दृढता आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. आणि नेहमीच लक्ष्य निश्चित करणे आणि त्यास मिळवणे याचे प्रतिक म्हणून याचा उपयोग केला जातो.
येथे पोस्ट पाहा –
#WATCH | Tokyo | Chief Priest of Shorinzan Daruma-Ji Temple presents Daruma Doll to PM Modi
(Video source: ANI/DD) pic.twitter.com/m4alaRQBMZ
— ANI (@ANI) August 29, 2025
या परंपरे अंतर्गत लक्ष्य निश्चित केले जाते,तेव्हा बाहुलीचा एक डोळा रंगवला जातो आणि जेव्हा लक्ष्य साध्य होते, तेव्हा दुसरा डोळा रंगवला जातो.हा हार न मानण्याच्या गुणाचे एक प्रतिक देखील आहे. या बाहुलीचा गोल खालचा भाग यास पुन्हा उभी करतो. त्यामुळे या बाहुलीच्या बाबतीत ‘सात वेळा पडा, आठ वेळा उठा ‘ अशी म्हण आहे.
दारुमा कांचीपुरम येथील एका भारतीय भिक्षू बोधीधर्मावर आधारित आहे. यांना जपानमध्ये दारुमा दाईशी या नावाने ओळखले जाते. असे म्हटले जाते की बोधीधर्म यांनी भिंतीकडे तोंड करुन, आपल्या शरीराला वाकवून सलग 9 वर्षांपर्यंत ध्यानधारणा केली होती. यामुळेच दारुमा बाहुलीचा आकार अनोखा गोलाकार आहे.ज्यात कोणता अवयव नाही ना डोळे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी टोकियोत जपानचे माजी पंतप्रधान योशीहिदे सुगा आणि फुमियो किशिदा यांची भेट घेतली, टॅरिफ संदर्भात अमेरिकेशी झालेल्या संघर्षानंतर मोदी आज सकाळी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर पोहचले आहेत. त्यांनी जपानची प्रतिनिधी सभेचे ( संसदेचे खालचे सभागृह ) अध्यक्ष फुकुशिरो नुकागा यांची भेट घेतली.
या भेटी संदर्भात पीएम मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की किशिदा यांच्याशी भेट शानदार होती. मोदी लिहितात की ते (किशिदा )नेहमी भारत आणि जपान यांच्यातील मजबूत संबंधाचे प्रबळ समर्थक राहिले आहेत. आम्ही व्यापार, प्रमुख तंत्रज्ञान आणि मानवी संसाधन क्षेत्रातील द्विपक्षीय भागीदारीतील प्रगतीवर चर्चा केली.