AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी बनले जगातले सर्वाधिक सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान, 26 देशांनी गौरवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल नामिबियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यंत 26 देशांनी त्यांच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने त्यांना गौरवले आहे. आतापर्यंत 26 पुरस्कार मिळविणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

नरेंद्र मोदी बनले जगातले सर्वाधिक सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान, 26 देशांनी गौरवले
| Updated on: Jul 10, 2025 | 3:09 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक ऐतिहासिक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. मोदी यांना 26 अधिक देशांनी त्यांच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने गौरवले आहे. असे करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अलिकडे त्यांना नामिबिया, घाना आणि ब्राझीलने सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला आहे. तर घाना सरकारने मोदी यांना’ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्‍टार ऑफ घाना’ (Officer of the Order of the Star of Ghana) पुरस्काराने गौरवले आहे. हा पुरस्कार त्यांची नेतृत्व क्षमता आणि भारत-घाना संबंध मजबूत करण्यात बहमुल्य योगदान दिल्याबद्दल देण्यात आला आहे. मोदी यांनी घानाचा हा पुरस्कार घानाची जनता आणि युवकांना समर्पित केला असून हा पुरस्कार भारत-घाना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधाचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.

याआधी नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी यांना सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्याआधी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष इनासियो लूला दा सिल्वा यांनी मोदी यांचा ‘ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊदर्न क्रॉस ( Grand Collar of the National Order of the Southern Cross ) या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने गौरवले आहे. हा पुरस्कार त्यांना भारत-ब्राझील द्वीपक्षीय संबंधांना मजबूत करण्यासाठी देण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांना देशांनी दिला सर्वोच्च पुरस्कार

देशनागरिक पुरस्कार
सौदी अरबऑर्डर ऑफ किंग अब्दुलअजीज अल सऊद
संयुक्त अरब अमीरातऑर्डर ऑफ जायेद
रशिया ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू
ब्राझीलग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साउदर्न क्रॉस
घानाऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना
मालदीवऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इज्जुद्दीन
बहारीन किंग हमद ऑर्डर ऑफ द रिनेसां
अमेरिकालीजन ऑफ मेरिट
सायप्रसड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस थर्ड
मॉरिशसग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार एंड की ऑफ द इंडियन ओशन
कुवैत ऑर्डर मुबारक अल कबीर
गयानाऑर्डर ऑफ द फ्रीडम
नायजेरियाग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द फेडरल रिपब्लिक
डोमिनिका डोमिनिका अवार्ड ऑफ ऑनर
ग्रीसग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर
पॅलेस्टाईनग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन
अफगानिस्तानस्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान
इजिप्तऑर्डर ऑफ द नाईल
नामिबियाऑर्डर ऑफ द मोस्ट एंशिएंट वेलविट्सकिया मिरेबिलिस
त्रिनिदाद व टोबैगोर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद एंड टोबैगो
पलाऊएबाकल अवॉर्ड
पापुआ न्यू गिनीऑर्डर ऑफ लोगोहू
फिजीकंपैनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी
भूतानऑर्डर ऑफ द द्रुक ग्यालपो
तिमोरलेस्ते ग्रँड ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्ते

मुस्लीम बहुल देशांकडूनही गौरव

साल 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना लागोपाठ अनेक देशांकडून त्यांचे सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळालेले आहेत. काही मुस्लीम बहुल देशांनीही मोदी यांचा गौरव केला आहे. या देशात सौदी अरब, यूएई, बहारीन, अफगानिस्तान, पॅलेस्टाईन, कुवैत सारख्या देशांनी देखील त्यांना आपला सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन गौरवले आहे. हे केवळ मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना दर्शवत नाही तर जगभरात भारताची वैश्विक ओळख आणि भूमिका किती मजबूत झाली आहे याचेही निदर्शक आहे.

2016 पासून दरवर्षी मिळत आहे सन्मान

आतापर्यंत 26 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. यात आशिया, युरोप,आफ्रीका, आखाती देश, ओशिनिया आणि अमेरिकेतील देशांचा समावेश आहे. 2016 पासून आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या दशाकडून हा मान मिळत आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणत देशातील 140 कोटी जनतेच्या आकांक्षांना आणि विकासाच्या स्वप्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जात आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.