PM Modi UK visit : लंडनमध्ये पीएम मोदी यांचे जोरदार स्वागत, पहा का महत्वाचा आहे हा दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आले आहेत.लंडन येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या निमित्ताने सर्वांचे लक्ष दोन देशात होणाऱ्या मुक्त व्यापार कराराकडे (FTA) लागले आहे.

PM Modi UK visit : लंडनमध्ये पीएम मोदी यांचे जोरदार स्वागत, पहा का महत्वाचा आहे हा दौरा?
PM Modi UK visit
| Updated on: Jul 24, 2025 | 9:30 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी युनायटेड किंगडमच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर लंडनला पोहचले आहेत. मोदी यांचे लंडनमध्ये भव्य स्वागत करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांमध्ये या दौऱ्यानिमित्त उत्साह पाहायला मिळाला. पीएम मोदी यांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करारावर ( एफटीए ) सह्या होणार असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.

ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यलयाचे मंत्री आणि हिंद प्रशांत क्षेत्राच्या प्रभारी कॅथरीन वेस्ट यांनी लंडन एअर एअरपोर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले आहे. ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरईस्वामी आणि दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमरन हे यावेळी त्यांच्यासोबत होते.

येथे पोस्ट पाहा –

पीएम मोदी या प्रसंगी काय म्हणाले ?

पीएम मोदी यांनी या प्रसंगी सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करत सांगितले की लंडन येथे पोहचलो आहे. त्यांनी पुढे म्हटले की हा दौरा भारत आणि ब्रिटन दरम्यान आर्थिक सामंजस्याला आणखीन मजबूत करेल.या दौऱ्याचा हेतू आपल्या लोकांची समृद्धी, विकास आणि रोजगाराला प्रोत्साहन देने हा आहे.

येथे पोस्ट पाहा –

दौरा का महत्वाचा आहे ?

पीएम मोदी यांचा हा दौरा अनेक अर्थाने महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात सर्वात महत्वाचे भारत आणि ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करारावर ( एफटीए ) सह्या होणे महत्वाचे आहे. भारत आणि ब्रिटन दरम्यान पीएम मोदी आणि कीर स्टार्मर यांच्या उपस्थितीत एफटीए (मुक्त व्यापार करार )वर सह्या होणार आहेत. या कराराने चामडे, बुट आणि कपडे यांच्या सवलतीच्या दरात निर्यात शक्य होणार आहे. तर ब्रिटनकडून व्हीस्की आणि कारची आयत स्वस्तात करता येणार आहे.

पीएम मोदी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या सोबत बैठक करणार आहेत. आणि दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. एफटीएपासून भारताला टैरिफ प्रकरणात मोठी मदत मिळणार आहे,कारण ९९ टक्के भारतीय निर्यातीला टैरिफने फायदा होण्याची शक्यता आहे. या व्यापार करारांतर्गत ब्रिटीश कंपन्यांना भारताला व्हीस्की, कार आणि अन्य उत्पादन निर्यात करणे सोपे होणार आहे.

किंग चार्ल्स III यांची भेट घेणार

पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याचा हेतू भारत आणि ब्रिटन या दोघांमध्ये व्यापार धोरणात्मक भागीदारीच्या (सीएसपी) वाढीचा आढावा घेणे हा आहे. तसेच या दौऱ्या दरम्यान पीएम मोदी किंग चार्ल्स III यांचीही भेट घेणार आहेत. यानंतर पीएम 25-26 जुलै रोजी मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

भारतीयांनी केले जोरदार स्वागत

पंतप्रधान मोदी यांचे लंडनमध्ये भारतीय समाजाने मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे. पीएम लंडनला पोहचल्यानंतर भारतीयांमध्ये खासा उत्साह पाहायला मिळाला. सर्वजण पीएम मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होते. सर्वांना पंतप्रधानांचे उत्साहाने स्वागत केले.पंतप्रधानांनीही त्यांच्या बातचीत करुन लहान मुलांना आशीवार्द दिला.

पीएम मोदी यांच्या भेटीनंतर मूळ भारतीय नागरिक असलेल्या गहना गौतम यांनी म्हटले की मी आत्ताच पंतप्रधानांची भेट घेतली. ते आमच्या जवळून गेले. हा एक अद्भूत क्षण होता. मला त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचे संधी मिळाली.

येथे पोस्ट पाहा –

“पीएम मोदी यांनी मला आशीर्वाद दिला”

भव्या हीने सांगितले की मी पीएम मोदी यांच्याशी हात मिळवला आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. हा खूप खास अनुभव होता. दाऊदी बोहरा समाजाच्या काही सदस्य देखील पंतप्रधानांशी भेट घेण्यासाठी उत्सुक दिसले. त्यांनी म्हटले की दाऊदी बोहरा असल्यामुळे आम्हाला पंतप्रधान आणि आमच्या समुदायादरम्यान असलेल्या नात्याचा अभिमान आहे. ते अनेक वर्षांपासून आमच्या समुदायाचे मित्र आहेत. एक दाऊदी बोहरा आणि एक ब्रिटीश नागरिक या नात्याने आम्ही त्याचे स्वागत करतो.

मोदी यांच्या दौऱ्याबद्दल भारतीय समुदायाचे सदस्य रामचंद्र शास्री म्हणाले की मोदी यांच्याशी भेटून आम्ही आनंदी आहोत. आम्ही सर्व आज या ठिकाणी कुटुंबासह आलो आहोत. पीएम मोदी हे खूप क्रांतीकारी व्यक्ती आहेत. ते केवळ भारताच्या विकासा संदर्भात बोलत नाहीत तर संपूर्ण सरकारच्या प्रगतीवर बोलतात. ते वेद, पुराण, उपनिषद सारख्या सर्व शास्रांना समजतात आणि ते लोककल्याणाची गोष्टी करतात.