
भारतासाठी हा आठवडा महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसाच्या इस्रायल दौऱ्यावर जात आहेत. ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. इस्रायली पंतप्रधानांनी मोदींना प्रेमळ मित्रं म्हटलं. दोन्ही देशांमध्ये संबंध भक्कम होत असल्याचं सांगितलं. “कॅबिनेट मीटिंगच्या सुरुवातीलाच मी माझे जवळचे नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक दौऱ्याबद्दल बोललो. इस्रायल आणि भारत इनोवेश, सिक्योरिटी आणि स्ट्रॅटजिक विजनमध्ये पार्टनर आहेत” असं नेतन्याहू यांनी X वर लिहिलय. इस्रायल पश्चिम आशियामधील मित्र देशांचं नेटवर्क बनवण्याच्या योजनेवर काम करत असल्याची सुद्धा नेतन्याहू यांनी घोषणा केली. त्यानी या आघाडीला ‘हेक्सागन ऑफ अलायंसेस’ नाव दिलं आहे. कट्टरपंथी शत्रू विरोधात लढण्याच्या उद्देशाने ही आघाडी उभी करण्यात येत आहे.
हेक्सागन ऑफ अलायंस ही सहादेशांची एक संघटना असेल, ज्यात पश्चिम आशिया आणि त्याच्या आसपासचे देश सहभागी होतील. भारत, ग्रीस, सायप्रस, अरब, आफ्रिकी आणि आशियाई देश या आघाडीत असतील. टाइम्स ऑफ इस्रायलनुसार, नेतन्याहू म्हणाले की, “माझ्या समोर जे विजन आहे, त्यानुसार आम्ही एक पूर्ण सिस्टिम बनवू. आव्हान, लक्ष्य आणि कट्टरपंथीय विचारधारा यांच्या विरोधात एकसारखी विचार असलेले देश यामध्ये असतील” निश्चितच ही आघाडी कट्टरपंथीय विचारधारेला, दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला महाग पडेल.
या आघाडीचे अन्य उद्देश काय?
ही आघाडी IMEC इंडिया मिडिल ईस्ट-यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर सारखी असेल. याचा उद्देश कनेक्टिविटी वाढवून इकोनॉमिक डेवलपमेंटला प्रोत्साहन देणं सुद्धा आहे. ही आघाडी आर्थिक सहकार्य, कूटनितीक समन्वय आणि सुरक्षा सहकार्य यात समन्वय साधेल. प्रस्तावित आघाडी इराणला उत्तर देण्याच्या दृष्टीने असेल. नेतन्याहू शिया एक्सिस विरोधात विजय मिळवण्याचा प्रयत्न करतायत असं जाणकारांनी सांगितलं. याकडे एक्सिस ऑफ रेसिस्टेंस म्हणूनही पाहिलं जातय.
हेक्सागन ऑफ अलायंसेसमध्ये सहभागी होण्यात भारतासमोर आव्हान काय?
भारतासाठी हेक्सागन ऑफ अलायंसेसमध्ये संधी आणि अडचण दोन्ही आहे. स्ट्रेटेजिक दृष्टीने पश्चिम आशियात भारताचं स्थान अजून बळकट होईल. डिफेंस आणि नवीन टेक्नोलॉजी मिळेल. IMEC सारखे कनेक्टिविटी प्रोजेक्ट्स बरोबर जोडले जाऊ. कूटनितीक दृष्टीने अरब देशांसोबत भारताचे जुने संबंध आहेत. इराणसोबतही भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अरब, इराण हे इस्रायलचे कट्टर विरोधक आहेत. यात बॅलन्स साधण्याचे आव्हान भारतासमोर असेल.