PM Modi On Trump Phone Call : फोन कॉलवर बोलणं झाल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावर पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया

PM Modi On Trump Phone Call : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत माझं फोनवर बोलणं झालं असं सांगितलं. आता पीएम मोदींची त्यावर प्रतिक्रिया आली आहे.

PM Modi On Trump Phone Call : फोन कॉलवर बोलणं झाल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावर पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया
PM Modi-Trump
| Updated on: Oct 22, 2025 | 9:51 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागच्या काही दिवसांपासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सतत स्टेटमेंट देत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी परस्परासोबत फोनवर चर्चा केली. दिवाळीच्या ऐकमेकांना शुभेच्छा दिल्या. खुद्द पीएम मोदींनी पोस्ट करुन राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत फोनवर बोलणं झाल्याच सांगितलं. ‘तुमचा फोन कॉल आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद’ असं पीएम मोदी म्हणाले.

“राष्ट्रपती ट्रम्प तुमचा फोन कॉल आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांसाठी खूप-खूप धन्यवाद. या प्रकाशोत्सवात आपल्या दोन महान लोकशाहींनी जगाला आशेच किरण दाखवला. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपल्याला एकजूट रहावं लागेल” असं पीएम मोदी आपल्या सोशल मिडिया पोस्ट X वर म्हणाले.

ट्रम्प काय म्हणालेले?

“मी भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. आमची खूप चांगली चर्चा झाली. आम्ही व्यापाराबद्दल बोललो” असा ट्रम्प यांनी दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रामुख्याने व्यापाराच्या मुद्यावर चर्चा झाल्याच ट्रम्प म्हणाले. “आम्ही अनेक मुद्यांवर चर्चा केली. पण जास्त करुन व्यापारी विषयावर बोललो” ‘भविष्यात भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणार नाही’ असा मोठा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केला. व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प पत्रकारांशी बोलत होते.

याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रकाशोत्सवाच्या सोमवारी शुभेच्छा दिल्या. ‘कुटुंब आणि मित्र परिवाराने एकत्र येऊन सेलिब्रेट करण्याची ही वेळ आहे’ ट्रम्प आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हणाले की, “आज प्रकाश पर्व दिवाळी आहे. हा सण साजरा करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना मी शुभेच्छा देतो”


लवकरच यातून मार्ग निघू शकतो

सध्या भारत आणि अमेरिकेत अनेक मुद्दे आहेत. टॅरिफ, ट्रेड डील असे अनेक विषय आहेत. त्यावरुन दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्याचा फटका निर्यात कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बसत आहे. पण आता लवकरच यातून मार्ग निघू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.