
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अमेरिकी दौरा खूप महत्त्वपूर्ण होता. व्यापार-संरक्षणाच्या दृष्टीने या दौऱ्याच विशेष महत्त्व आहेच. डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे अमेरिकी उद्योगांच्या संरक्षणासाठी आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचा मेक्सिको, कॅनडा आणि चीन या देशांना फटका बसला. भारताच्या बाबतीतही ट्रम्प असा निर्णय घेऊ शकतात ही धास्ती आहे. अलीकडे ट्रम्प यांनी जे निर्णय घेतले, त्याचा शेअर बाजारावर विपरित परिणाम झाल्याच दिसून आलं. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. काही लाख कोटी रुपये बुडाले. त्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांचा हा अमेरिका दौरा खास आहे. गुरुवारी ओवल ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यावेळी व्यापार-संरक्षणाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे करार झाले.
मोदींच्या या अमेरिका दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प एक मोठी गोष्ट भारताला द्यायला तयार झालेत. अमेरिकेच हे महाशस्त्र भारताला मिळालं, तर चीन-पाकिस्तानवर मोठी जरब बसेल. भारत रशिया, फ्रान्स आणि अमेरिका या तीन देशांकडून सर्वात जास्त शस्त्रास्त्र खरेदी करतो. त्यात रशिया आणि फ्रान्स या दोन देशांशी भारताचे जुने संरक्षण संबंध आहेत. मागच्या काही वर्षात भारताने अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी वाढवली आहे. अमेरिकेकडून टेहळणी विमान आणि अन्य संरक्षण साहित्य भारताने विकत घेतली आहेत. पण मोदींच्या या दौऱ्यात अमेरिकेने भारताला F-35 देण्याची तयारी दाखवली आहे. F-35 हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात घातक फायटर विमान आहे. F-35 हे पाचव्या पिढीत स्टेल्थ फायटर विमान आहे. रडारला सुद्धा हे विमान सापडत नाही. अत्यंत अचूक वार करण्याची या लढाऊ विमानाची क्षमता आहे.
असं शस्त्र आपल्याकडे असणं फायद्याचच
अलीकडचे चीनने सहाव्या पिढीच फायटर जेट विकसित केल्याची बातमी आली होती. त्याशिवाय चीन पाकिस्तानला पाचव्या पिढीच फायटर जेण देणार असल्याच्या सुद्धा बातम्या आल्या. भारताला स्वत:ला पाचव्या पिढीच फायटर विमान बनवायला अजून वेळ लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने F-35 देण्याची दाखवलेली तयारी एक मोठी बाब आहे. भारत आतापर्यंत फायटर विमाने फक्त रशिया आणि फ्रान्सकडून विकत घेत आला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “यावर्षी आम्ही भारताला काही अब्ज डॉलर्सची सैन्य साहित्य विक्री वाढवणार आहोत. आता आम्ही भारताला F-35 स्टेल्थ फायटर देण्याचा मार्ग सुद्धा प्रशस्त करत आहोत”