AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लेन हायजॅकचं धक्कादायक सत्य समोर! दोन्ही पायलटमध्ये जोरदार भांडण, एकाने तर थेट…त्या घटनेत काय घडलं?

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाला बुधवारी अचानक मार्ग बदलून सौदी अरेबियातील ताबुककडे वळवण्यात आले. विमानातून आपत्कालीन सिग्नल जारी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर इस्रायलमध्ये मोठी खळबळ उडाली.

प्लेन हायजॅकचं धक्कादायक सत्य समोर! दोन्ही पायलटमध्ये जोरदार भांडण, एकाने तर थेट...त्या घटनेत काय घडलं?
PLANE CRASH Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 3:30 PM
Share

यूएईमधील दुबईतून इस्रायलमधील तेल अवीव येथे जाणाऱ्या एका विमानातून अचानक इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला विशेष म्हणजे आपत्कालीन स्थिती म्हणून या विमानाचा मार्ग अचानक बदलून त्याचे सैदी अरेबिया येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार या विमानातून हायजॅकिंगचा इमर्जन्सी अलर्टही जारी करण्यात आला होता. परंतु याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. ही घटना समोर येताच इस्रायलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी बैठक बोलावली असून विमानाच्या स्थितीतबाबत जाणून घेतले जात आहे. हे विमान फ्लाय दुबई या कंपनीचे आहे. दरम्यान, आता या कथित विमान हायजॅकिंगबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पायलटनेच हे विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन पायलटमध्ये भांडणही झाले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार यूएईहून एक विमान इस्रायलला जात होते. परंतु या विमानाचे सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यातील एका पायलटने दुसऱ्या पायलटवर चाकून वार केला. तसेच हवेत असणारे विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न करण्यात आले. तसे वृत्त इस्रायलचे न्यूज चॅनेल आय 24 ने दिले आहे. या विमानाने अगोदर इमर्जन्सी सिग्नल दिले होते. या इमर्जन्सी सिग्नलनंतर इस्रायलने आपले लढाऊ विमान पाठवले होते. या विमानात साधारण 180 प्रवासी होते. यापैकी बहुसंख्य प्रवासी हे इस्रायली होते.

वैमानिकावर हल्ला का करण्यात आला?

दरम्यान, या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या अंगावर रक्ताचे डाग असल्याचाही दावा केला जातोय. दरम्यान, या घनटेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकावर का हल्ला केला, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही.

दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच इस्रायलची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. पंतप्रधान नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी आपत्कालीन बैठक बोलावली होती. आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. लवकरच वैमानीकांमध्ये वाद का झाला? हे समोर येणार आहे.

Follow Us
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...