
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शुक्रवारी १५ ऑगस्ट २०२५ रोजी अलास्कात बैठक होत आहे. या भेटीचा मुख्य उद्देश्य रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करणे हा आहे. जर ही बैठकीत या युद्धावर तोडगा निघाला तरच भारताचा फायदा होणार आहे. यामुळे रशियाकडून भारत घेतलेल्या तेलामुळे अमेरिकेने भारतावर लावलेल्या २५ टक्के अतिरिक्त टेरिफ वाचून वाचता येणार आहे.
ट्रम्प यांनी फॉक्स रेडियाला दिलेल्या एका मुलाखतीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या सोबत सामजंस्य करार होईल अशी आशा व्यक्त केली आहे. तर पुतीन यांनी म्हटले आहे की रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीसाठी ट्रम्प प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. जर शिखर बैठकीत करार झाला तर भारताला २७ ऑगस्टपासून लावलेल्या तेल शुल्कपासून वाचता येईल. परंतू पुतीन आणि ट्रम्प यांच्यात होणाऱ्या या बैठकीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेस्की सामील होणार नाहीत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्की यांनी अलिकडेच ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांनी संयुक्त घोषणापत्रात म्हटले होते की ट्रम्प आणि पुतीन संभाषणाच्या प्रगतीने एक व्यवहार्य संधी मिळणार आहे. परंतू पुतीन यांनी ते शांततेसाठी गंभीर आहे हे सिद्ध करण्यासाठी पावले उचलावीत. झेलेस्की जरी ट्रम्प आणि पुतीन यांच्या बैठकीला नसले तरी त्यांनी सांगितले आहे की युक्रेनशी संबंधीत प्रत्येक गोष्टीचा निर्णय युक्रेनच्या भागीदारीनी घ्यायला हवा.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी सांगितले की अंतिम समझोता राष्ट्राध्यक्ष झेलेस्की आणि पुतीन यांनाच करायचा आहे. ट्रम्प यांनी म्हटले की अलास्कात पुतीन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत पुढच्या बैठकीची रुपरेषा ठरणार आहे. पुढची बैठक शक्यतो अलास्कातच होणार आहे. आणि त्यात राष्ट्राध्यक्ष झेलस्की देखील उपस्थित असतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की दुसऱ्या टप्प्यातील चर्चा जास्त महत्वाची असणार आहे. यात माझे रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षशिवाय अनेक युरोपीय नेते देखील सामील होऊ शकतात.ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि पोलंड सारख्या युरोपीय देशांनी रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्याच्या अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांची स्तुती केली आहे.