AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या एफ-35 ला या छोट्या देशाने दिले उत्तर, आणले 4.5 पीढीचे केएफ-21 जेट फायटर

KF-21 Boramae: अमेरिकेच्या F-35 ला तोड देणारे फायटर जेट विमान दक्षिण कोरियाने तयार केले आहे. KF-21 बोरामे नावाचे 4.5 पीढीचे हे फायटर जेट आशियातील सैन्य संतुलनाला आव्हान देणार असून पाश्चात्य देशांचे वर्चस्व कमी करणार आहे.

अमेरिकेच्या एफ-35 ला या छोट्या देशाने दिले उत्तर, आणले 4.5 पीढीचे केएफ-21 जेट फायटर
KF-21 Boramae
| Updated on: Aug 13, 2025 | 4:31 PM
Share

अमेरिका त्यांच्या F-35 विमानामुळे नेहमीच गमजा मारत असतो. या महागड्या फायटर जेटला भारतासह अनेक देशांना विकण्याची ऑफर अमेरिकेने दिली आहे. परंतू भारताने त्यास खरेदी करण्यात रस दाखवलेला नाही. अमेरिकेचे वर्चस्व कमी करण्यासाठी साऊथ कोरिया आता स्पर्धेत उतरला आहे. साऊथ कोरियाने इंडोनेशियाच्या मदतीने आपल्या हिंमतीवर 4.5 पीढीचे KF-21 बोरामे फायटर जेट तयार केले आहे. हे विमान भारत सध्या वापरत असलेल्या फ्रान्सच्या राफेलच्या तोडीचे आहे.

2022 मध्ये झाली पहिली टेस्‍ट फ्लाइट

हे विमान आशियातील सैन्य संतुलन बदलवण्याच्या दिशेत दक्षिण कोरियाची मोठी झेप मानली जात आहे. कोरिया एअरोस्पेस इंडस्ट्रीजने (KAI) इंडोनेशियाच्या मदतीने यास तयार केले आहे. KF-21 Boramae एक आधुनिक 4.5 पिढीचे मल्टी रोल फायटर जेट आहे.या विमानास अमेरिकेच्या विमानांवर अवलंबित्व कमी करण्यासाठी घरगुती संरक्षण उद्योगाला मजबूत करण्यासाठी विकसित केले आहे. हे विमान आशियातील सैन्य संतुलन बदलवणार आहे.

कोरिया एअरोस्पेस KF-21 ची पहिली टेस्ट फ्लाईट 19 जुलै 2022 मध्ये झाली होती. हे विमान हवेत वर्चस्व स्थापित करण्यासोबत जमीन आणि समुद्री लक्ष्यांनाही अचूक भेदत आहे. 16.9 मीटर लांबी आणि 11.2 मीटर विंगस्पॅन असणारे हे विमान दोन General Electric F414-GE-400K टर्बोफॅन इंजिनावर संचलित होते. जे याला 2,200 किमी/प्रति तासांचा (Mach 1.81) वेग देतात. याची रेंज 2,900 किलोमीटर आणि कॉम्बॅट रेडीयस सुमारे 1,100 किलोमीटर आहे.

रडारवर ओळखणे कठीण

शस्रास्रांचा विचार करता KF-21 मध्ये 0 हार्डपॉईंट आहेत, ज्याच्यावर 7,700 किलोग्रॅमपर्यंत वजन पेलोड केले जाऊ शकते. हे विमान AIM-120 AMRAAM, Meteor आणि IRIS-T सारख्या अत्याधुनिक एअर-टू-एअर मिसाईल, JDAM आणि Mk सिरीजचे बॉम्बसह एंटी-शिप मिसाईल तैनात होऊ शकतात. यात 20 मिमी M61A2 वल्कन कॅनन देखील आहे. येत्या काही वर्षात हे विमान इंटरनल वेपन बे आणि उन्नत स्टील्थ फिचर्ससह अपग्रेड केले जाणार आहे. डिझाईनच्या दृष्टीने हे KF-21 स्टेल्थ-फ्रेंडली आहे. हे संपूर्णपणे F-35 सारखे इनव्हीजबल नाही.परंतू याची संरचना आणि सामुग्री रडारवर ओळख बऱ्याच प्रमाणात कमी करते.

साल 2032 पर्यंत प्रोडक्‍शन

या विमानाला साऊथ कोरियाचे स्वदेशी AESA रडार, हाय टेक ग्लास कॉकपिट आणि आधुनिक डेटा लिंक सिस्टीम सामील आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत सुमारे 7.9 अब्ज डॉलर आहे.तर प्रति विमानाची किंमत 65 ते 70 दशलक्ष डॉलरच्या दरम्यान आहे. दक्षिण कोरिया या विमानाला साल 2032 पर्यंत त्यांच्या वायूसेनेत 120 KF-21 सामील करण्याची योजना तयार करत आहे. तर इंडोनेशियात स्वत:साठी 50 विमान तयार करणार आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.