AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतारच्या LNG प्लांटमध्ये भीषण स्फोट, काही भारतीयांसह 13 जणांचा मृत्यू

Qatar LNG Plant Explosion : रास लाफान औद्योगिक शहरात झालेल्या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यात काही भारतीय लोकांचाही समावेश आहे.

कतारच्या LNG प्लांटमध्ये भीषण स्फोट, काही भारतीयांसह 13 जणांचा मृत्यू
qatar lng plant explosionImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 22, 2026 | 10:44 PM
Share

कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरात झालेल्या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यात काही भारतीय लोकांचाही समावेश आहे. कतार एनर्जीने सोमवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, देशातील प्रमुख ऊर्जा केंद्र असलेल्या रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात रविवारी उशिरा रात्री हा स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल कंपनीने तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मृतांमध्ये भारतीय लोकांचा समावेश

कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस पुरवठा प्रकल्पाची देखभाल केल्यानंतर पुन्हा बसवताना हा स्फोट झाला. स्फोटानंतर मोठी आग लागली होती, मात्र स्थानिक अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांच्या पथकांनी ती वेगाने नियंत्रणात आणली. या घटनेतील मृतांमध्ये काही भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेत एकूण 66 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये कतार, भारत, पाकिस्तान, टांझानिया, गिनी, नेपाळ, बांगलादेश, केनिया आणि नायजेरिया येथील नागरिकांचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

LNG उत्पादनावर परिणाम नाही

रास लाफान हे कतारचे सर्वात मोठे औद्योगिक आणि ऊर्जा केंद्र असून येथे जगातील सर्वात मोठ्या द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) उत्पादन आणि निर्यात सुविधा आहेत. हा परिसर कतारच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार मानला जातो आणि जागतिक LNG पुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. कतार एनर्जीने स्पष्ट केले आहे की या स्फोटामुळे LNG उत्पादन, निर्यात प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या प्रकल्प आणि बंदर दोन्ही पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

स्फोटाचे कारण शोधण्यासाठी समितीची स्थापना

स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी कतार एनर्जीने उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी समिती स्थापन केली आहे. तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्फोट झाल्याचे समोर आले आहे, मात्र अंतिम अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरातील सुरक्षा वाढवली असून जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?