AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात चीन सहभागी? खळबळजनक अहवाल, अशी केली थेट मदत, हुआवेई फोन..

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना टार्गेट करत गोळ्या झाडल्या. आता पहलगाम हल्ल्याबद्दल हैराण करणारा अहवाल पुढे आलाय, ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात चीन सहभागी? खळबळजनक अहवाल, अशी केली थेट मदत, हुआवेई फोन..
Pahalgam Attack
| Updated on: Oct 05, 2025 | 8:40 AM
Share

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि देशभरात एकच खळबळ उडाली. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळीबार केला. त्यांच्या निशाण्यावर फक्त आणि फक्त होती हिंदू पर्यटक. हल्ल्यानंतर काही तासांमध्येच अमित शहा पहलगाममध्ये पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यावर असताना त्यांनी आपला दाैरा अर्धवट सोडून भारत गाठला आणि विमानतळावरच अधिकाऱ्यांनी महत्वाची बैठक बोलावली. पहलगाम हल्ल्याचे काही धक्कादायक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होताना दिसली. मात्र, आता नुकताच पहलगाम हल्ल्याबद्दल अत्यंत धक्कादायक असा दावा करण्यात आला. दाव्यानुसार, पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानची मदत चीनने केली होती, यामागे चीनचा देखील हात आहे. तसे पुरावे देखील मिळाली आहेत.

चीनवरील तज्ज्ञ प्राध्यापक श्रीकांत कोंडापल्ली यांच्या रिपोर्टनंतर एकच खळबळ उडाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील एका दहशतवाद्याकडे हुआवेई फोन होता असा दावा त्यांनी केला. एएनआयसोबत बोलताना कोंडापल्ली म्हणाले की, पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा एका दहशतवादीकडे चिनी उपग्रह कनेक्शन असलेला हुआवेई फोन होता. हेच नाही तर याच्या माध्यमातूनच त्याने पाकिस्तानमध्ये हल्ल्यानंतर मेसेज पाठवला.

पहलगाम हल्ल्यामध्ये चीनची भूमिका अगदी स्पष्टपणे दिसून येते. दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला करण्याच्या अगोदर चीनने पहलगामच्या 120-129 उपग्रह प्रतिमांच्या स्लाईड्स देखील पुरवल्या. दहशतवादाविरुद्ध भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायासोबत उभे राहण्याची वचनबद्धता असूनही भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्ताला चीन मदत करत असल्चाचे स्पष्ट होतंय.

हेच नाही तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) चर्चेतून सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) चे नाव पाकिस्तानने काढून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जातंय. टीआरएफने सुरुवातीला दोनदा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी चीनचे राजदूत आणि पाकिस्तानी राजदूत यांनी यूएनएससीच्या चर्चेतून टीआरएफचे नाव काढून टाकले. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात.

भारतात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी चीन पाकिस्तानला मदत करत असल्याने भारताला अधिक धोका निर्माण झाला आहे. हेच नाही तर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनचे संबंध चांगले होताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडून चीन पाकिस्तानसोबत मिळून भारताच्या विरोधात कट रचताना स्पष्ट दिसत आहे. आता भारत चीनविरोधात नेमकी काय भूमिका घेतो हे देखील पाहण्यासारखे ठरेल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.