Nepal Flash Flood : नेपाळच्या विनाशात मोठी दिलासादायक बातमी, त्रिशुली प्रकल्पात मोठे यश, अजूनही..

नेपाळच्या त्रिशुली प्रकल्पातून मोठी माहिती पुढे येत आहे. त्रिशुली प्रकल्पामधील मजुरांना वाचवण्यात मोठे यश आले. त्यात काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. नेपाळमध्ये बचावकार्य राबवले जात आहे.

Nepal Flash Flood : नेपाळच्या विनाशात मोठी दिलासादायक बातमी, त्रिशुली प्रकल्पात मोठे यश, अजूनही..
Nepal Flash Flood
| Updated on: Aug 28, 2026 | 3:33 PM

नेपाळमध्ये स्थिती भीषण आहे. पुराने हाहाकार माजवला आहे. हजारो लोक बेपत्ता आहेत. या पुरामध्ये ठार झालेल्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. नेपाळमधून भारतात पुराच्या पाण्यात प्रेत वाहून येत आहेत. भारतातील नद्यांची पातळीही वाढली आहे. नेपाळमधून भारतात येणाऱ्या नदी काटच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. काही गाव रिकामीही करण्यात आलीत. नेपाळमध्ये अजूनही संकट कायम आहे. संकट टळलेले नाही. नेपाळमधील अंगावर काटा आणणारे व्हिडीओ पुढे येत आहेत. काही क्षणात सर्व संपले आहे. बचावकार्य राबवले जात आहे. नेपाळकडे जगाच्या नजरा आहेत. नेपाळला मदतीकरिता अनेक देशांनी हात पुढे केली आहेत. भारताने काही मदतही नेपाळकडे पाठवली आहे. भारतीय लष्कराची विमाने 10 टन साहित्य घेऊन नेपाळमध्ये पोहोचले.

बचावकार्यात मदत करण्याचा प्रस्तावही भारताने नेपाळला दिला. मात्र, तो प्रस्ताव नेपाळने नाकारला. भारतासोबतच अनेक देशांनी नेपाळला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र,नेपाळने स्पष्ट केले की, आमच्याकडे बचावकार्य आहे. आम्हाला आर्थिक मदत हवी आहे. अमेरिकेने देखील नेपाळला हवी ती प्रत्येक मदत करणार असल्याचे जाहीर केले.

त्यामध्येच आता नेपाळमधून एक चांगली बातमी पुढे येताना दिसतंय. रसुवामध्ये नेपाळी सैन्याने अपर त्रिशूलीमध्ये हाइड्रोपावर टनलमध्ये फसलेल्या 350 मजुरांची सुटका केली. यावेळी स्थानिक लोकांनीही मोठी मदत केली. या मजुरांमध्ये 63 लोक हे भारतीय होते. पूर आणि खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर ही बचावकार्य राबवण्यात आले. नेपाळी सैन्याच्या माहितीनुसार, टनलमध्ये अजूनही 100 पेक्षा जास्त लोक फसले आहेत.

त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे. बचाव पथकाने आतापर्यंत स्याफ्रुबेसी, मैलुंग, टिमुरे, थुलो हाकु, हाकुबेसी या संवेदनशील भागातून 533 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तिबेटमधील धरण फुटल्याने नेपाळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला. स्थिती अधिक गंभीर आहे. अजूनही कित्येक लोक बेपत्ता आहेत. त्यातच पुढील काही तास नेपाळवर धोका हा कायम असणार आहे. नेपाळमधील नुकसानाचा आकडा अजून पुढे आला नाहीये.

Follow Us