बांगलादेशात मोठा हादरा! राष्ट्रपतींचा तडका फडकी राजीनामा, शेख हसीना यांना संपर्क केल्याने..

बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अचानक त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली.

बांगलादेशात मोठा हादरा! राष्ट्रपतींचा तडका फडकी राजीनामा, शेख हसीना यांना संपर्क केल्याने..
Mohammed Shahabuddin resigns
| Updated on: Jul 24, 2026 | 5:41 PM

बांगलादेशात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी येत आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अचानक त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली. बांगलादेशच्या संविधानातील कलम 50(3) अन्वये, राष्ट्रपती आपला राजीनामा सभापतींकडे सादर करतात. शेख हसीना यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी लंडन दाैऱ्यावर असताना केल्याने त्यांना थेट आपल्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. बांगलादेशातील सत्तापरिवर्तनानंतर शेख हसीना भारतात आहेत. रिपोर्टनुसार, मे महिन्यात लंडनला मोहम्मद शहाबुद्दीन गेले होते, त्यावेळी त्यांनी शेख हसीना यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आली. बांगलादेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. बांगलादेशच्या BNP सरकारने माजी पीएम खालिदा जिया यांचा मुलगा तारिक रहमान प्रधानमंत्री आहेत.

काही दिवसांपूर्वीच शेख हसीना यांनी बांगलादेशला परत जाण्यावर भाष्य केले. सत्तापरिवर्तनवेळी शेख हसीना भारतात आल्या होत्या. सप्टेंबर 2026 मध्ये त्या पुन्हा बांगलादेशात जाणार आहेत, याबाबत त्या भाष्य करताना दिसल्या. मागील काही दिवसांपासून मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला. मात्र, त्यांनी राजीनामा देताना आरोग्याच्या समस्यांमुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले.

बांगलादेशच्या द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, त्यांनी सुरूवातीला राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. या मुद्द्यात मला जास्त बोलायचे नसल्याचे त्यांनी सुरूवातीला म्हटले. मात्र, आता त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. त्यांच्या राजीनाम्याबद्दल दबाव वाढला होता. शेख हसीना यांच्यासोबत संपर्क केल्याने त्यांच्याविरोधात लोकांचा रोष वाढला होता.

बांगलादेशच्या संसदेचे अध्यक्ष हाफिजउद्दीन अहमद यांनी सांगितले की, 5.1 वाजता त्यांनी मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा मंजूर केला. आता पुन्हा एकदा बांगलादेशच्या राजकारणात मोठा भूकंप आला. शेख हसीना यांच्यासोबत संपर्क साधणे मोहम्मद शहाबुद्दीन यांना महागात पडले. शेख हसीना बांगलादेशात जाणार की नाही? याबाबत अजून संभ्रम आहे. मात्र, शेख हसीना यांना भारतात आश्रय दिल्याने बांगलादेश आणि भारतामधील संबंध तणावात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us