AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध थांबेना…! ट्रम्प यांच्याकडून डिझेल खरेदी घोषणा, दुसरीकडे रशियाने…संपूर्ण जगात हाहाकार!

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. यामुले जगात हाहाकार झाला आहे.

युद्ध थांबेना...! ट्रम्प यांच्याकडून डिझेल खरेदी घोषणा, दुसरीकडे रशियाने...संपूर्ण जगात हाहाकार!
russia Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 9:21 PM
Share

रशियाने युक्रेनवर पुन्हा भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाने युक्रेनमधील झापोरिझिया भागात हल्ला केला आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीची घोषणा केली आहे. परंतु या करारामुळे रशियाला युद्ध, हल्ला करण्यासाठी मदत होईल, असा दावा युक्रेनने केला. आता करारानंतरच रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे.

प्रादेशिक लष्कराचे प्रमुख मिखाइलो सेमिकीन यांनी सांगितलं की, झापोरिझियामधील निवासी इमारतीवर रशियाने हवाई हल्ला केला. इमारतीवर केलेल्या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला. यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. तर या हल्ल्यात 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर रशियाने युक्रेनच्या झापोरिझिया शहरावर पाच बॉम्बहल्ले केले. यात तीन मुलांसह 15 जण ठार झाले. या शहरातील निवासी इमारतीवर ग्लाइड बॉम्ब टाकण्यात आले आहेत. रशियाने शनिवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात 16 जण जखमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर अद्याप काही जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांनी रात्री 13 भागांवरही हल्ले केल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी केला आहे.

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले सुरूच आहे. दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांवर हल्ले करत आहेत. दोन्ही देशांत सुरू असलेल्या युद्धाला 5 वर्ष झाली आहेत. पाच वर्षानंतरही दोन्ही देशात युद्ध सुरूच आहे. रशियाच्या वाढत्या बॉम्बहल्ल्याचा युक्रेनला सामना करावा लागत आहे. मागील चार दिवसांत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे अमेरिकेने मॉस्कोवर अनेक वर्ष दबाव टाकला होता. त्याच्या उलट कृती अमेरिकेने केली आहे. त्यात अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीच्या आधी इंधनदर कमी व्हावेत, यासाठी रशियाकडून डिझेल खरेदीसाठी करार केला आहे,असे बोलले जात आहे. ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लगेच रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प आणि रशियाचे पुतिन यांच्यासोबत शुक्रवारी फोनवर बोलताना हा करार झाला. एकीकडे रशियात प्लेगने धुमाकूळ घातला आहे, त्या चर्चेऐवजी दोन्ही देशात मोठा करार झाल्याचे समोर आलं आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे