AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच होतंय, व्लादिमीर पुतिन यांनी उचलले घातक पाऊल, आता वाट लागणार..

इराण आणि अमेरिका युद्ध शांत झालेले असतानाच तिकडे युक्रेन आणि रशिया युद्ध पेटल्याचे बघायला मिळतंय. त्यातच अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने धक्कादायक इशारा दिला. त्यांच्या या माहितीने मोठी खळबळ उडाली.

जगाला ज्याची भीती तेच होतंय, व्लादिमीर पुतिन यांनी उचलले घातक पाऊल, आता वाट लागणार..
Vladimir Putin and NATO
| Updated on: Aug 08, 2026 | 8:18 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध कुठेतरी थांबताना दिसत आहे. ज्यामुळे जगाने सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही पेटले आहे. या युद्धाचा फटका सर्वांनाच बसतोय. युक्रेन आणि रशिया युद्धात एक मोठे संकट उभे आहे. त्यामध्येच अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, नाटो संघटनेची ताकद बघण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. व्लादिमीर पुतिन नाटो देशांवर हल्ले करू शकतात, असा इशारा दिला. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या या अहवालामुळे मोठी खळबळ उडाली. युक्रेनसोबतच नाटो देश रशियाच्या निशाण्यावर असल्याचे बोलले जातंय. ही बातमी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अमेरिकेकडील शस्त्रास्त्रांचा साठा कमी होत चालला आहे. मात्र, जर हे खरे ठरले तर मोठे युद्ध भडकेल.

सीएनएनच्या वृत्तानुसार, हा हल्ला म्हणजे युद्ध सुरू करणे अजिबात नाही. नाटो देशांची एकता आणि कलम 5 ची परीक्षा घेण्याचा उद्देश आहे. कलम 5 अन्वयेनुसार, एखाद्या सदस्य देशावरील हल्ला हा सर्वच सदस्य देशांवरील हल्ला मानला जातो. पुतिन यांची पुढील चाल लाटविया, लिथुआनिया, एस्टोनिया, पोलंडच्या दिशेने असू शकते.

गुप्तचर अहवालांनुसार, रशिया सायबर हल्ल्यांपासून ते मर्यादित लष्करी घुसखोरीपर्यंतच्या विविध पर्यायांचा विचार करू शकतो. मागील काही दिवसांपासून नाटो देश रशियाविरोधात भूमिका घेत आहेत. रशियाविरोधात एका मागून एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. शिवाय रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही नाटोकडून दबाव टाकला जात आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर चिंता अधिक वाढली आहे.

अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यात कमालीची घट झाली आहे. इराणसोबतच्या युद्धात त्यांनी मोठ्या प्रमाणात आपला शस्त्रसाठा वापरला आहे. अमेरिकेने इराणसोबतच्या युद्धात थाड क्षेपणास्त्र इंटरसेप्टर्सपैकी सुमारे 80 टक्के वापरली आहेत.  पॅट्रियटचा फक्त 50 टक्के साठाच शिल्लक आहे. ज्यामुळे नाटो देशांचे टेन्शन अधिकच वाढले. युक्रेन आणि रशिया युद्धात अमेरिका मध्यस्थी करताना दिसली. मात्र, अगोदर युद्ध पेटवून द्यायचे आणि त्यानंतर ते मिटवल्यासारखे दाखवायचे, असा आरोप अमेरिकेवर होत आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?