AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav: दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सूर्याने दाखवला लेकीचा चेहरा, पाहा Video

Suryakumar Yadav Daughter Face Revealed: सूर्यकुमार यादवने दिवाळीच्या शुभमुहुर्तावर आपल्या लेकीचा चेहरा दाखवला आहे.

Suryakumar Yadav: दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सूर्याने दाखवला लेकीचा चेहरा, पाहा Video
| Updated on: Nov 07, 2026 | 7:40 AM
Share

Suryakumar Yadav Daughter: क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने आपल्या कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्याच्या पत्नीसोबत एक लहान मुलगीही उपस्थित होती. त्या मुलीने पंतप्रधान मोदींसाठी एक भजन गायले, ज्याचे पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून आणि जल्लोष करून कौतुक केले. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत पंतप्रधानांनी लिहिले, “दिवाळीच्या वातावरणात राम आणि सरयू यांचे आगमन झाले आहे. यामुळे दिवाळीचे वातावरण अधिकच पवित्र आणि दिव्य झाले आहे.” पण यात एका गोष्टीने लक्षवेधले.

ही भेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली, जिथे सूर्यकुमार यादवच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी एका लहान मुलीचे भजनही ऐकले. त्या भजनाने पंतप्रधान मोदी खूप आनंदित झाले. यावेळी सूर्याच्या मुलीची झलकही पाहायला मिळाली आहे. सूर्याच्या मुलीचे नाव रिद्धिमा असून तिची झलक सर्वांना यावेळी पाहायला मिळाली. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूर्याच्या मुलीची झलक पाहायला मिळाली आहे.

सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघाबाहेर आहे. तो शेवटचा २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाकडून खेळला होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडला पराभूत करून टी-२० विश्वचषक जिंकला होता.

सूर्यकुमार यादवने भारतीय संघासाठी एक कसोटी, ३७ एकदिवसीय आणि ११३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टी-२० मधील त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने ११३ सामन्यांमध्ये ३६.३६ च्या सरासरीने आणि १६२.९५ च्या स्ट्राइक रेटने ३,२७२ धावा केल्या आहेत. या काळात त्याने २५ अर्धशतके आणि चार शतके झळकावली आहेत. ३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने चार अर्धशतकांसह २५.७७ च्या सरासरीने ७७३ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने एक कसोटी सामना खेळला असून त्यात आठ धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादवने ५२ सामन्यांमध्ये भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ४० सामने जिंकले आणि आठ गमावले, तर दोन सामने अनिर्णित राहिले आणि दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. त्याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने एकही द्विपक्षीय टी-२० मालिका किंवा बहुसंघीय स्पर्धा गमावलेली नाही. परिणामी, चाहत्यांनी त्याला संघातून वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि या निर्णयाचा निषेध केला.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?