मोठी बातमी! तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली? रशियाचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, पुतिन यांचा क्षेपणास्त्र हल्ला
मोठी बातमी समोर येत आहे, पुतिन यांच्या या हल्ल्यामुळे आता जगाचा थरकाप उडाला असून, हा हल्ला म्हणजे तिसऱ्या महायुद्धाला निमंत्रण मानला जात आहे.

रशियाचं युक्रेनसोबत युद्ध सुरूच आहे. गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत या दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. प्रचंड प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा व्हावी यासाठी भारतापासून ते अमेरिकेपर्यंत सर्वचं देशांचे प्रयत्न सुरू आहेत, अमेरिकेकडून अनेकवेळा रशियावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र ट्रम्प यांचे सर्व प्रयत्न हे अयशस्वी ठरले आहेत.
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियानं आता थेट पोलंडवर हल्ला केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रशियन सैनिकांनी पोलंडवर 19 ड्रोन हल्ले केले आहेत. ज्यातील चार ड्रोन हल्ले परतून लावल्याचा दावा पोलंडच्या सैनिकांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलंड नाटो देशांचा सदस्य आहे. नाटोच्या नियमानुसार नाटोच्या सदस्य असलेल्या कोणत्याही एका देशावर दुसरा देश जो नाटोचा सदस्य नाही, त्याने हल्ला केल्यास तो हल्ला संपूर्ण नाटो देशांवरील हल्ला मानला जातो. त्यामुळे रशियानं पोलंड वर केलेला हा हल्ला तिसऱ्या महायुद्धाला दिलेलं निमंत्रण मानलं जातं आहे, आता अमेरिका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. हा डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण सध्या अमेरिका हा नाटो देशांचं नेतृत्व करतो.
एक्सियोसच्या एका रिपोर्टनुसार बुधवारी नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडमध्ये रशियाची विमानं दिसली आहेत, रशियानं हल्ला करण्यासाठी हे ड्रोन पाठवल्याचा दावा पोलंडकडून करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे अद्याप यावर रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.
रशियानं पोलंडवर का हल्ला केला?
पोलंडवर मिसाईल हल्ला का करण्यात आला? याबाबत रशियाकडून अद्यापपर्यंत कोणतंही स्पष्टिकरण देण्यात आलेलं नाहीये, मात्र असा अंदाज लावला जात आहे की, रशियाला युक्रेनवर हल्ला करायचा होता, मात्र ही मिसाईल चुकून पोलंडच्या हद्दीमध्ये घुसली असावीत. पोलंड हा युक्रेनचा शेजारी देश आहे. रशियाची चार क्षेपनास्त्र पाडल्याचा दावा पोलंडने केला आहे.
दरम्यान 1939 साली पोलंडवर केलेल्या हल्ल्यानंतरच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती, हिटरने पोलंडवर हल्ला केला होता. तर आता रशियाकडून पोलंडवर हल्ला करण्यात आला आहे, रशिया हा नाटोचा सदस्य देश असल्यानं आता जगाचं लक्ष अमेरिकेकडे लागलं आहे.
