
अमेरिका सध्या रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी अनेक देशांवर दबाव टाकत आहे. अमेरिकेने दोन प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर बंदी घातली आहे. एकेकाळी रशियाचा दुसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार असलेल्या भारताच्या मागे अमेरिका हात धुवू लागलीये. रशिया युक्रेन युद्ध बंद करायच असेल तर रशियाकडून तेल खरेदी जगातील देशांनी बंद करावी, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारताबद्दल धक्कादायक दावा करताना अमेरिकेने म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करून त्यावर रिफायनरी करून जगभरात विकून नफेखोरी करतोय. भारतावर तब्बल 50 टक्के लावण्याचा धक्कादायक निर्णय अमेरिकेने घेतला.
कच्च्या तेलाच्या बाबतीत रशियाने सूर्यफूल तेलाच्या बाबतीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. गेल्या चार वर्षांत रशियाकडून भारताच्या सूर्यफूल तेलाच्या आयातीत बारा पट वाढ झालीये. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनियन सूर्यफूल तेल बहुतेक युरोपमध्ये गेले आहे. हेच नाही तर यामुळे रशिया आता भारतासाठी एक विश्वासार्ह पुरवठादार बनला आहे. अमेरिकेच्या दबावामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचे सांगितले जाते.
रिपोर्टनुसार, रशिया आणि भारतातील उद्योग प्रतिनिधींनी अलीकडेच पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी भेट घेतली. यामुळे भविष्यात एक वेगळे समीकरण बघायला मिळेल. 2021 मध्ये भारताच्या एकूण सूर्यफूल तेल आयातीत रशियाचा वाटा 10 टक्के होता, भारताने 2024 च्या वर्षात रशियाकडून 2.09 दशलक्ष टन सूर्यफूल तेल आयात केली, जी खूप जास्त आहे. विशेष म्हणजे ही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतंय.
भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर विविध प्रकारे दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून केले जात आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी अमेरिकेची आहे. मात्र, अमेरिकेच्या दबावानंतर भारताने तेल खरेदी सुरूच ठेवलीये. चीन हा रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा नंबर 1 चा देश आहे. मात्र, चीनबाबत वेगळी भूमिका अमेरिकेची आहे.