रशियाचा मोठा हल्ला, थेट मध्यरात्रीच स्फोटाचे हादरे, जगात खळबळ, युद्ध…

रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ पूर्ण जगाला बसत आहे. त्यामध्येच अमेरिका हे युद्ध रोखण्यासाठी मध्यस्थी करताना सध्या दिसत आहे. आता मोठी खळबळ उडाली असून थेट मोठे हल्ले कीव शहरावर करण्यात आली.

रशियाचा मोठा हल्ला, थेट मध्यरात्रीच स्फोटाचे हादरे, जगात खळबळ, युद्ध...
Russia attacked Ukraine
| Updated on: Dec 27, 2025 | 2:30 PM

शनिवारी पहाटेच्या सुमारास युक्रेनची राजधानी कीव शहरात जोरदार हल्ले करण्यात आली. लोक झोपलेले असताना अचानक शहरात सायरन वाजण्यास सुरूवात झाली आणि काही सेकंदात मोठे बॉम्बस्फोट झाली. रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनियम अधिकाऱ्यांना इशारा जारी करत राजधानी कीववर मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका जारी केला. यासोबतच सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा थेट इशारा दिला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये धावपळ बघायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमधील स्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. या युद्धामुळे देश दोन भागात विभागले गेले. याचा फटका सर्वांनाच बसत आहे. अमेरिका रशिया आणि युक्रेन युद्धात मध्यस्थी करताना दिसत आहे. मात्र, अजूनतरीही सकारात्मक गोष्टी प्रत्यक्षात घडताना दिसत नाहीत.

कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी शहरातील स्फोटांबद्दलची माहिती दिली. युक्रेनियन हवाई दलाने राजधानीसह देशाच्या इतर अनेक भागांमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा जारी केला. अनेक भागांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची हालचाल आढळून आल्या. रशिया आणि युक्रेन युद्धात अमेरिकेचा रशियावर दबाव आहे. मात्र, अमेरिकेने दिलेला शांतता प्रस्ताव रशियाने मान्य केला. त्याला युक्रेनकडूनच विरोध करण्यात आला.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. रशिया युक्रेन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे. मात्र, झेलेन्स्की हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला जाण्यापूर्वीच रशियाने कीवला टार्गेट करत हल्ले केली आहेत. युक्रेनकडून सध्या रशियाच्या महत्वाच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना टार्गेट करून बॉम्ब हल्ले घडवली जात आहेत.

अमेरिकेची मध्यस्थी आणि युद्धविराम यासारख्या मुद्द्यांवर विचार केला जाऊ शकतो. 2022 पासून सुरू असलेल्या या युद्धामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर जीवित झाली असून मोठे नुकसान होत आहे. रशिया जगात तेल विकून या युद्धाला पैसा वापरत असल्याचा आरोप अमेरिकेचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध रोखायचे असल्याचे अमेरिकेने म्हटले. दुसरा शांतता प्रस्ताव अमेरिकेने तयार केला आहे. पुतिन हे काही दिवसांपूर्वीच भारताच्या दाैऱ्यावर आले होते.