
युक्रेनकडून रशियावर स्पायडर वेब ऑपरेशन करण्यात आले. त्यात रशियाची ४१ लढाऊ विमाने नष्ट झाली. त्याचा मोठा बदला घेण्याची तयारी रशियाकडून सुरु आहे. रशियाने ७ आणि ८ जून रोजी युक्रेनवर भीषण हल्ले केले होते. या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले. त्यानंतरही रशियाकडून हल्ले थांबलेले नाही. आता रशियाकडून युक्रेन आणि त्यांना मदत करणाऱ्या राष्ट्रांवर मोठ्या हल्ल्याची तयारी सुरु आहे. अमेरिकेने दिलेल्या या अहवालामुळे युक्रेन आणि युरोपची चिंता वाढली आहे.
रशियाकडून गेल्या ९६ तासांपासून हल्ले सुरुच आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. पुतिन यांचा प्लॅन यूक्रेनसह युरोप राष्ट्रांवर मोठ्या हल्ल्याचा आहे. ऑपरेशन स्पायडर वेबमुळे झेलेंस्की आपलेच कौतूक करुन घेत होते. आता तेच ऑपरेशन युक्रेनसाठी मोठे विनाश ठरत आहे. रशियाने ७ आणि ८ जून रोजी युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. ९६ तासांपासून युक्रेनवर हल्ले सुरु आहे.
पेंटागनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाचा बदला अजून पूर्ण झाला नाही. रशिया आणखी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. पुढील काही दिवसांत रशियाचे हे ऑपरेशन सुरु होऊ शकते. त्याच्या पहिल्या टप्प्यात ड्रोन हल्ले वाढवले जातील. दुसऱ्या टप्प्यात क्षेपणास्त्र हल्ले होतील. तिसऱ्या टप्प्यात रशिया ओरेशनिक क्षेपणास्त्राने हल्ले करणार आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ल्यासाठी सहा प्लॅन तयार केले आहेत. त्याचा शेवट अणू हल्ल्याने होऊ शकतो. ड्रोन हल्ल्याचा पहिला टप्पा ९६ तासांपासून सुरु आहे.
रशिया दुसऱ्या टप्प्यात युक्रेनच्या मोठ्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करणार आहे. रशियाने काळा समुद्र ते बाल्टिक समुद्रापर्यंत हल्ल्याची तयारी केली आहे. रिपोर्टनुसार रशियाने दोन सबमरीन तैनात केल्या आहेत. या दोन्ही सबमरीनमध्ये २४ क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. तसेच बाल्टिक समुद्रात दोन युद्धनौका तैनात केल्या आहेत. या दोन्ही युद्धनौकातून जिरकॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे. युक्रेनच्या स्ट्रॅटेजिक ठिकाणांसह रशियाने फ्रंटलाइनवर भीषण हल्ले सुरु आहेत. फ्रंटलाइनवर रशिया कामिकाजी आणि एफपीव्ही ड्रोन ब्रिगेडने यूक्रेनवर मोठा हल्ले करत आहे.