IND vs SA 5th T20i : टीम इंडियाची फायनलमध्ये बॅटिंग, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 3 बदल, संजू सॅमसन In की पुन्हा आऊट?
India vs South Africa 5th T20i Toss Result and Playing 11 : पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात टीम इंडियाच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला आहे. या सामन्यात संजू सॅणसन याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची मालिका 2-1 ने बरोबरीत आहे. उभयसंघातील चौथा सामना हा धुक्यांमुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना हा अत्यंत निर्णायक असा ठरणार आहे. या पाचव्या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार एडन मार्रक्रम याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव टॉस गमावल्यानंतरही आनंदी होता. टॉस गमावूनही सूर्याला जे हवं होतं ते मिळालं. आम्हीही टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला असता असं सूर्याने टॉसनंतर रवी शास्त्री यांच्यासह बोलताना म्हटलं. त्यामुळे आता टीम इंडिया या 20 ओव्हरमध्ये किती धावा करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दोन्ही संघांत बदल
या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेने फक्त 1 बदल केला आहे. तर टीम इंडियात अपेक्षेपेक्षा जास्त बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हन एकूण 3 बदल करण्यात आले आहेत. उपकर्णधार शुबमन गिल याला दुखापताीमुळे पाचव्या टी 20i सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे संजू सॅमसन याला संधी मिळाली आहे. संजू अशाप्रकारे 1 वर्षानंतर ओपनिंग करणार आहे.
तसेच जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे हर्षित राणा याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागलं आहे. जसप्रीतने चौथ्या सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती. मात्र लखनौतील हा सामना धुक्यांमुळे रद्द करण्यात आला होता. तसेच फिरकीपटू कुलदीप यादव याच्या जागी ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर याचा समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss 🚨#TeamIndia have been asked to bat first in Ahmedabad.
Updates ▶️ https://t.co/kw4LKLNSl3#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/9CQQzczAPE
— BCCI (@BCCI) December 19, 2025
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्रक्रम (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी आणि ओटनील बार्टमन.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
