खरा मित्र रशियाच, वाईट काळात घेतला थेट मोठा निर्णय, व्लादिमीर पुतिन..

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. भारत आणि रशिया यांचे संबंध नक्की कसे आहेत, हे जगाने बघितले. यादरम्यानच जगाला धक्का देत रशियाकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला.

खरा मित्र रशियाच, वाईट काळात घेतला थेट मोठा निर्णय, व्लादिमीर पुतिन..
Vladimir Putin and modi
| Updated on: May 19, 2026 | 9:19 AM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपूर्वीच भारत दाैऱ्यावर आले होते. यावेळी काही महत्वपूर्ण करार करण्यात आली. पुतिन तब्बल 8 मंत्र्यांसोबत दाैऱ्यावर होते. विविध क्षेत्रात मोठे करार केले. ज्यावेळी अमेरिकेने भारतावर 200 टक्के टॅरिफ लावला, त्यावेळी भारताचा जुना आणि खरा मित्र रशिया खंबीरपणे उभा राहिला. आपली बाजारपेठ त्यांनी भारताकरिता पुर्णपणे खुली केली. रशियाने भारत आणि चीन यांच्यातील संबंधही सुधारण्याकरिता पुढाकार घेतला. व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र चीन दाैऱ्यावर गेले. हा जगासाठी मोठा दणका होता. इराण आणि अमेरिका युद्धात जग तेलाच्या मोठ्या समस्येत आहेत. कच्च्या तेलाचा तुटवडा आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. होर्मुज खाडी बंद असल्याने तुटवडा निर्माण झाला. या काळातही रशिया भारताच्या मदतीला धावून आला. भारताला हवे तेवढे तेल रशियाकडून दिले जात आहे.

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री जगाने बघितली. यादरम्यानच आता मोठी बातमी पुढे येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सप्टेंबर महिन्यात भारत दाैऱ्यावर असणार आहेत. 8 महिन्यानंतर पुन्हा पुतिन भारत दाैऱ्यावर आहेत. भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीला भेट देणार आहेत. सध्याच्या जगातील परिस्थितीमध्ये पुतिन यांचा हा दाैरा महत्वाचा आहे.

भारत 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. याच परिषदेकरिता पुतिन भारत दाैऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत होणारी 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाईल. इराण आणि अमेरिका युद्धात जगाचे मोठे नुकसान होत असताना ही परिषद आहे.

विशेष म्हणजे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे की, मॉस्कोदेखील यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यजमानपद भूषवण्याची तयारी करत आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये खाण्यापिण्याचे वांदे आहेत. गॅसची मोठी समस्या आहे. कच्चे तेल त्यांच्या देशात येणे जवळपास बंद झाले. यादरम्यान भारतात स्थिती चांगली आहे. रशिया भारताला पाहिजे तेवढे कच्चे तेल तेल आहे.

Follow Us