
India Pakistan Conflict : सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अजूनही ताणलेलेचे आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवरील हल्ले थांबवलेले असले तरी अद्याप, सिंधू जलवाटप करार, विमानांसाठी हवाई क्षेत्रावरील बंदी, व्यापर बंदी यासारखे निर्णय अजूनही दोन्ही देशांनी कायम ठेवलेले आहेत. असे असतानाच आता पाकिस्तानची झोप उडवणारी माहिती रशियाने दिली आहे. या माहितीनंतर आता भारताचे बळ वाढणार असून पाकिस्तानसाठी मात्र हे चांगलेच धोक्याचे ठरू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार रशियाचे भारतातील अधिकारी रोमन बाबूश्कीम यांनी भारताला सोमवारी (2 जून) एक महत्त्वाची माहिती दिली आहे. भारताला हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली एस-500 ची उर्वरित खेप नियोजित वेळेनुसार आगामी वर्षात म्हणजेच 2026 साली दिली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. भारताकडे सध्या असलेली S-400 ही अशी प्रणाली आहे, जी हवाई हल्ले परतवून लावण्याचे काम करते. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले केले होते. हे हल्ले याच S-400 प्रणालीच्या मदतीने निकामी करण्यात आले होते. आता याच प्रणालीचा उर्वरित टप्पा भारताला नियोजित वेळेनुसार मिळणार आहे. ही प्रणाली आल्यानंतर सामरिकदृष्ट्या भारत आणखी बलवान होणार आहे. यामुळेच पाकिस्तानची डोकेदुखी वाढू शकते.
याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान एस-400 या प्रणालीने खूपच चांगले काम केले आहे, असे आम्ही ऐकले आहे. भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण क्षेत्रात अनेक वर्षांच्या सहकार्याचा इतिहास आहे. माला मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित एस-400 प्रणाली ही निर्धारित वेळेनुसार भारताला दिली जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दरम्यान, भारताने रशियासोबत 2018 साली तब्बल 5.43 अब्ज डॉलर्सचा एक करार केला होता. या कराराअंतर्गत रशिया भारताला एकूण पाच एस-400 अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टम देणार आहे. या पाच पैकी एकूण तीन प्रणालींना पाकिस्तान तसेच चीनच्या सीमेलगत पश्चिमी तसेच उत्तर भागात तैनात करण्यात आलेले आहे. एस-400 प्रणालीची पहिली खेप भारताल डिसेंबर 2021 साली देण्यात आली होती. तर दुसरी आणि तिसरी खेप क्रमश: एप्रिल 2022 आणि ऑक्टोबर 2023 मध्ये देण्यात आली होती. आता नियोजित वेळेनुसार उर्वरित एस-400 प्रणाली भारताला दिली जाणार आहे.