रशियात सिक्रेट लॅबमध्ये संशोधकाचा मृत्यू, शेकडो लोक क्वारंटाइन, कोरोनाचे दिवस आठवले, प्रयोगशाळेत नेमकं घडलं काय?

तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध वेगाने सुरु आहे. शेलेखोव रुग्णालयात जवळपास 200 लोक क्वांरटीन आहेत. डेली मेलनुसार, तिन्ही रुग्णालयात क्वारंटीनचे नियम लागू करण्यात आले आहेत.

रशियात सिक्रेट लॅबमध्ये संशोधकाचा मृत्यू, शेकडो लोक क्वारंटाइन, कोरोनाचे दिवस आठवले, प्रयोगशाळेत नेमकं घडलं काय?
Russia Lab
| Updated on: Oct 05, 2026 | 1:39 PM

सायबेरियात एका लॅबमध्ये घडलेल्या घटनेने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कथित संक्रमणाशी संबंधित हा विषय आहे. ही प्रयोगशाळा रशियामध्ये आहे. इरकुत्स्क अँटी प्लेग रिसर्च इंस्टीट्यूटच्या 28 वर्षाच्या संशोधकाचा निमोनियाने मृत्यू झाला. त्यानंतर शेकडो लोक क्वारंटाइन झाले आहेत. अधिकाऱ्यांनी प्लेगची पुष्टि केलेली नाही. कुठल्या मोठ्या संकटाचेही पुरावे मिळालेले नाहीत. या सगळ्या विषयावर अमेरिकेचं लक्ष आहे. दार्या शिपिलोवा या महिलेचा मृत्यू झाला आहे. 29 सप्टेंबरला निमोनिया झाल्यामुळे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ही महिला वेंटिलेटरवर होती. दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. दार्याने हॉस्पिटलमध्ये असताना डॉक्टरांना सांगितलेलं की, तिच्या हातून जिवंत बॅक्टेरिया असलेली टेस्ट ट्यूब तुटली. मंगोलिया सीमेजवळ बुर्यातिया फिल्ड ट्रिप दरम्यान ती आजारी पडली. शेलेखोव रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलेलं.

तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध वेगाने सुरु आहे. शेलेखोव रुग्णालयात जवळपास 200 लोक क्वांरटीन आहेत. डेली मेलनुसार, तिन्ही रुग्णालयात क्वारंटीनचे नियम लागू करण्यात आले आहेत. गवर्नर इगोर कोबजेव यांनी सांगितलं की, महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची ओळख पटवण्यात आली असून ते क्वांरटीन आहेत. जे क्वारंटीन आहेत, त्यांच्यात कुठलही लक्षण आढळलेलं नाही ते नेगेटिव्ह आहेत. लॅबच्या जवळ असलेल्या एल्युमिनियम प्लांटने सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालायला सांगितलं आहे.

Loading...

कोविड 19 चे दिवस आठवले

दार्या शिपिलोवाचा मृत्यू कदाचित प्लेगने झाला असावा असं बुर्यतियाचे प्रमुख अलेक्सेई सिदेनोव यांनी सांगितलं. तिथे प्लेगचा प्रकोप नाहीय. रोस्पोट्रेबनाडजोरने प्लेगची पुष्टि केलेली नाही. बुर्यतिया ही संस्था संक्रमण पसवरणाऱ्या आजाराचा अभ्यास करते. म्हणून हे प्रकरण संवेदनशील आहे. रशियन महामारी एक्सपर्ट मिखाइल फावोरोव यांनी टेस्ट ट्यूब तुटणं अशक्य असल्याचं म्हटलं. या घटनेनंतर अनेकांना कोविड 19 चे दिवस आठवले आहेत. कदाचित कोविड काळ पुन्हा येईल अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

अंतिम निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल

रशियाच्या चीफ सॅनिटरी डॉक्टर अन्ना पोपोवा मॉस्कोमधून सायबेरियात पोहोचल्या आहेत. कोबजेव तातडीच्या बैठकीत सहभागी झाले होते. गवर्नरने सुरुवातीला आजाराच नाव घेतलं नाही. शेलेखोवचे महापौर मैक्सिम मोदिन यांनी लोकांना अधिकृत माहितीवर विश्वास ठेवायला सांगितला आहे. अंतिम निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us