ज्या मित्रासाठी भारताने केला अट्टाहास त्यानेच सोडली साथ, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी रशिया थेट मैदानात, काही मिनिटातच…
डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून भारताला धमकावताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या मुद्द्यामध्ये भारतावर दबाव टाकत आहेत. यादरम्यान रशिया भारताच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, अशी अट अमेरिकेची होती. आता जाहीरपणे रशिया डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करताना दिसतोय.

डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कारावर दावा करताना दिसत आहेत. इस्त्रायल-हमास युद्ध धरून मी जगातील मोठी आठ युद्ध रोखली आहेत, मला वाटत नाही की दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने आतापर्यंत इतकी युद्ध रोखली. नोबेल शांतता पुरस्काराला काही मिनिटे शिल्लक असताना डोनाल्ड ट्रम्प पुरस्कारासाठी दबाव तंत्राचा वापर करताना दिसत आहेत. अनेक देशांनी थेट पणे नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन केले. रशिया आणि युक्रेन युद्धात देखील डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करताना दिसले. मात्र, त्यांच्या मध्यस्थीला यश मिळाले नाही. शेवटी त्यांनी रशियाकडून तेल खरेदी भारताने आणि चीनने बंद करावी, याकरिता दबाव टाकण्याचे काम केले.
नोबेल पुरस्कार जाहीर होण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन रशियाने केले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर मोठ्या हल्ल्याची धमकी रशियाने अमेरिकेला दिली. त्यादरम्यानच आता नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाला रशियाने देखील समर्थन दिल्याने जगाने भूवया उंचावल्या. थेट रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाला समर्थन दिले.
क्रेमलिन यांचे सल्लागार यूरी उशाकोव यांनी म्हटले की, मॉस्को डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यासाठी समर्थन देत आहे. युद्ध संपवण्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न केली. विशेष म्हणजे युक्रेनचे युद्ध संपवण्यासाठी ते खरोखरच प्रयत्न करताना दिसले. जर आम्हाला विचारले जाईल, तर आम्ही नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला, याकरिता समर्थन करू. युक्रेनचे युद्ध संपवावे म्हणून त्यांनी अलास्कामध्ये पुतिन यांची भेट घेतली.
मागच्या काही दिवसांपासून त्यांना या पुरस्काराची अपेक्षा आहे. पुतिन यांनी देखील एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले होते की, जर युक्रेनचे युद्ध रोखण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना यश मिळाले तर आम्ही देखील त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळण्यासाठी समर्थन देऊ. भारताने यावर अजूनही काही भूमिका स्पष्ट केली नाही. पाकिस्तान देखील डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला याकरिता समर्थन करताना दिसत आहे. मात्र, भारत तटस्थ भूमिकेत दिसत आहे.
