AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia-ukraine War : यूक्रेन हल्ल्याने हडबडलेल्या पुतीन यांचा ‘आण्विक संताप’, शैतान – 2 क्षेपणास्र तैनात करण्याची तयारी

युक्रेनने रशियावर धाडसी हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियाची ४० हून अधिक लढाऊ विमाने नष्ट झाली आहे. या हल्ल्याला आता रशिया काय प्रत्युत्तर देतो याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Russia-ukraine War : यूक्रेन हल्ल्याने हडबडलेल्या पुतीन यांचा 'आण्विक संताप', शैतान - 2 क्षेपणास्र तैनात करण्याची तयारी
| Updated on: Jun 02, 2025 | 7:19 PM
Share

रशिया आणि यूक्रेन यांचे युद्ध जवळपासून दोन – अडीच वर्षे सुरुच आहे. गुड फ्रायडे निमित्ताने सुरु असलेली सिजफायर संपल्यानंतर रशियाने दोनदा युक्रेनवर हल्ले केले. यावेळी रशियाने रहिवासी विभागात हल्ले केले होते. याचा बदला अखेर युक्रेनने घेतला आहे. युक्रेनने रशियाच्या 4,000 किलोमीटर आत घुसून साहसी ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या या हल्ल्यात रशियाच्या 40 हून अधिक लढाऊ विमानांचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या हल्ल्याने क्रेमलिनमध्ये खळबळ उडाली आहे. रशियाच्या एकूण पाच विमानतळांवर भीषण ड्रोन अॅटॅक झाल्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अक्षरश: हडबडले आहेत.

येथे पोस्ट पाहा –

युक्रेनने 40 हून अधिक लढाऊ विमानांचा अक्षरश: कोळसा केल्याने रशियाने एका जबरदस्त हल्ल्याची तयारी केली आहे. या आता ही वेळ पारंपारिक शस्रास्रांपर्यंत ही बाब मर्यादित राहणार नाही.या हल्ल्याला आता रशिया काय प्रत्युत्तर दिले जाते याकडे जगाचे लक्ष लागले असतानाच रशियाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

रशियाचे आण्विक ताबूत तयार!

रशियाकडे हा एकेकाळचा सुपरपॉवर देश आहे. त्याच्याकडे काही असे आण्विक शस्रास्रे आहेत जिच्यामुळे जग अवघ्या काही मिनिटांत नष्ट होऊ शकते. यातील सर्वात खतरनाक क्षेपणास्र “RS-28 सरमत” आहे, त्यास पाश्चात्य जगताने “Satan-2” असे नाव दिले आहे. हे आंतरखंडीय क्षेपणास्र आहे. या बॅलेस्टीक मिसाईलमध्ये 15-16 अणू बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. याची रेंज 13,000 ते 16,000 किलोमीटर इतकी प्रचंड आहे.

रशियाची प्रमुख घातक शस्रास्रे आणि क्षेपणास्रे

1. आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल (ICBMs)

RS-28 Sarmat (Satan-2): हे रशियाचे सर्वात अत्याधुनिक आणि विनाशकारी ICBM आहे. जे आण्विक शस्रास्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्र एकाच वेळी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हाहाकार माजवू शकतात.

Tochka-U: हे मध्यम पल्ल्याचे मिसाईल आहे, जी शत्रूच्या ठिकाणांवर अचूक हल्ले करते.

Iskander-M: हे मध्यम पल्ल्याचे परंतू अत्यंत घातक मिसाईल आहे. ज्याचा वापर महत्वाच्या लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ कमांड सेंटर्स, वगैरे ठिकाणांना याने लक्ष्य केले जाते.

2. क्रूज मिसाईल

Kalibr: रशियाची समुद्रावरुन डागता येणारी मिसाईल, जी अत्यंत अचूकपणे लक्ष्यभेद करते. यूक्रेन युद्धात या क्षेपणास्राचा अनेकवेळा वापर झाला आहे.

Kh-101: हे लांबपल्ल्याचे एअर-लॉन्च क्रूझ मिसाईल आहे. हे रशियाच्या बॉम्बवर्षाव करणाऱ्या विमानांवरुन सोडले जाते.

3. आण्विक शस्रास्रे

रशियाकडे मोठ्या प्रमाणावर रणनीतीक आणि सामरिक आण्विकअस्रं आहेत. ही अण्वस्रं युद्धात निर्णायक भूमिका वठवू शकतात.परंतू याचा प्रयोग जागतिक संतुलनासाठी खूपच संवेदनशील आहे.

4. हायपरसॉनिक मिसाईल

Avangard: ध्वनी पेक्षा 20 पट वेगाने उडणारे हे मिसाईल डिफेन्स सिस्टमला चकवा देऊ शकतात. Kinzhal: ही एक एअर-लॉन्च्ड मिसाईल आहे आणि ती फायटर जेटवरुन डागली जाते आणि टार्गेटवर वेगाने पोहचून त्यास बरबाद करते.

5. फायटर जेट आणि ड्रोन

Sukhoi-57 आणि Sukhoi-35: ही रशियाचे एक अत्याधुनिक लढाऊ विमान आहे जे मल्टीरोल्स क्षमतेने परिपूर्ण आहे.

ड्रोन:रशियाजवळ टोही आणि हल्ला करणारे अनेक पद्धतीची आधुनिक ड्रोन्स सिस्टम आहे.

6. मल्टीपल लॉन्च रॉकेट सिस्टम (MLRS) आणि वजनी तोफा

TOS-1A आणि Buratino: ही शस्रास्र हथियार एकाच वेळी अनेक रॉकेट डागण्यास सक्षम आहेत आणि शत्रूचे बंकर आणि लष्करी ठाण्यांना संपूर्णपणे नष्ट करण्याची त्यांची क्षमता आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.