
Donald Trump : अमेरिका हा जगातला एकमेव महासत्ता देश आहे. तर डोनाल्ड ट्रम्प या महासत्ता देशाचे प्रमुख आहेत. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम अमेरिकेसोबतच संपूर्ण जगावर पडतो. डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण हे ‘अमेरिका फस्ट’ असे राहिलेले आहे. याच धोरणानुसार त्यांनी आपल्या दुसऱ्या कारकिर्दीत अनेक धक्कादायक निर्णय घेतलेले आहेत. ते मी या जगातील सर्वात मोठा आणि अमेरिकेचा चेहरामोहरा बदलणारा नेता असल्याचा दावा करतात. परंतु सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्चस्वाला धक्का देणाऱ्या आणि त्यांची भविष्यातील राजकीय वाट खडतर असणार आहे, अशा काही घडामोड घडल्या आहेत. या घडामोडी कोणत्या आहेत? डोनाल्ड ट्रम्प यांना त्याचा नेमका काय फटका बसणार आहे? यावर नजर टाकू या… ममदानी यांचा विजय, ट्रम्प यांना धक्का गेल्या काही दिवसांत डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकारणाला धक्का देणाऱ्या काही घडामोडी घडून गेल्या आहेत. अलिकडे तर अमेरिकेतील राजकारणात त्यांना मोठा धक्का बसला आहे....