शीत युद्धकाळात युएसला चीतपत करणारी यंत्रणा रशिया करतंय अपग्रेड,चीन-पाक विरोधात भारताला होणार मदत?

पेचोरा S-125 मिसाईल सिस्टीमने सर्बियावरील अमेरिकन वायू सेनेच्या F-117 नाईटहॉक स्टील्थ फायटर-बॉम्बरला टार्गेट करत पाडले होते.

शीत युद्धकाळात युएसला चीतपत करणारी यंत्रणा रशिया करतंय अपग्रेड,चीन-पाक विरोधात भारताला होणार मदत?
Pechora S-125 Upgradation
| Updated on: Oct 07, 2026 | 7:04 PM

रशिया सोव्हीएत काळातील पेचोरा S-125 एअर डिफेंस सिस्टमला अपग्रेट करत आहे. या अपग्रेडेशनने पेचोरा सिस्टीमला मोबाईल लाँचरच्या रुपात तयार करण्यासाठी अधिक ताकदवान केले जाणार आहे. पेचोरा S-125 तिचे मिसाईल सिस्टीम आहे. जिने 27 मार्च, 1999 मध्ये कोसोव्हो युद्धा दरम्यान सर्बियावरील अमेरिकन वायू सेनेच्या F-117 नाईटहॉक स्टील्थ फायटर-बॉम्बरला टार्गेट करीत पाडले होते. F-117 नाईटहॉक अमेरिकेचे पहिले ऑपरेशनल स्टील्थ विमान आहे. त्यामुळे पेचोरा सिस्टीम अपग्रेडेशन भारतासाठी महत्वाची मानली जात आहे. भारताचा मुख्य शत्रू चीनकडे देखील आधीच रडारवर न दिसणारी स्टील्थ लढाऊ विमाने आहेत. आणि पाकिस्तान देखील लवकरच ही क्षमता प्राप्त करणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही एअर डिफेन्स कामी येणार आहे.

पेचोरा ही एक सोव्हिएत संघ काळातील स्थिर, छोट्या ते मध्यम अंतराच्या हवेतून मारा करणारी (SAM) एक मिसाईल सिस्टीम आहे. 1961 मध्ये सोव्हिएत संघाने ही मिसाईल सिस्टीम सादर केली होती. आणि भारतीय वायूसेनेने देखील या सिस्टीमला 1970 च्या दशकात आपल्या ताफ्यात सामील केली होती. याची सामान्य परिचालन मर्यादा 30 ते 35.4 किलोमीटरपर्यंत आहे.पेचोरा सिस्टीम 20 मीटर ते 20 ते 25 किलोमीटर एवढ्या कमी उंचीवरुन उडणाऱ्या लक्ष्यांना टार्गेट करते.

Loading...

पेचोरा सिस्टीमची रेंज आणि खासियत काय ?

पेचोरा सिस्टमला कमी आणि मध्यम उंचीवरुन उडणाऱ्या विमाने, क्रुझ मिसाईल आणि आधुनिक ड्रोनना नष्ट करण्यासाठी डिझाईन केले आहे. या सिस्टीममध्ये ‘4R90 यागाटन’ रडारचा वापर होतो, जे 100 किमी अंतरावरील टार्गेटना शोधून भेदते. ही मिसाईल सिस्टीम अत्यंत जाम वातावरणातही लक्ष्यांना भेदण्यास सक्षम आहे. आणि स्वतंत्रपणे वा एअर डिफेन्स समुहात एकीकृत होऊनही कार्य करु शकते. ही सिस्टीम जीपीएस नेव्हीगेशन प्रणालीने सुसज्जित आहे.

भारताने रशियन पेचोरा सिस्टीमला केले अपग्रेड

भारतीय वायुसेना अनेक वर्षांपासून पेचोरा एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर करते. भारताने 50 वर्षे जुन्या सोव्हिएत मूळाच्या पेचेरा मिसाईल सिस्टीमला अपग्रेड करुन याचे संपूर्ण आधुनिकीकरण आणि डिजिटलीकरण केले आहे. संरक्षण मंत्रालयाने बंगलुरु येथील खाजगी कंपनी अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ADTL) ला 16 पेचोरा सिस्टीम्सना अपग्रेड करण्यासाठी 591.3 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. याची यशस्वी चाचणी पोखरण फिल्ड फायरिंग रेंजमध्ये केली होती. पेचोरा सिस्टीममध्ये अपग्रेडेशन दरम्यान जुन्या व्हॅक्युम ट्युब आणि ट्रान्झिस्टर आधारित एनालॉग सिस्टीमला हटवून आधुनिक सेमीकंडक्टर डिजिटल चिप्स आणि प्रोसेसर लावले आहेत. यामुळे सिस्टीमचा रिस्पॉन्स टाईम खूपच कमी झाला आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us