AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vladimir Putin : युक्रेन भारी पडतोय, व्लादिमीर पुतिन यांची पहिल्यांदाच मोठी कबुली

Vladimir Putin : रशियाने युक्रेन विरुद्ध युद्ध सुरु करुन चार वर्ष होत आली आहेत. या युद्धात सर्वांनीच पाहिलय की रशियाने युक्रेनवर कसे हल्ले केले. पण आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पहिल्यांदाच मोठी कबुली दिली आहे. युक्रेन भारी पडत असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.

Vladimir Putin : युक्रेन भारी पडतोय, व्लादिमीर पुतिन यांची पहिल्यांदाच मोठी कबुली
Vladimir Putin
| Updated on: Jun 29, 2026 | 9:58 AM
Share

युक्रेन विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पहिल्यांदाच मोठी कबुली दिली आहे. युक्रेन रशियाच्या आत खोलवर हल्ले करत असून रशिया अडचणींचा सामना करत असल्याचं पुतिन यांनी मान्य केलं. आम्ही आमच्या सीमा सुरक्षित करु, या आव्हानावर मात करु असं पुतिन बोलले. युनायटेड रशिया पार्टी काँग्रेसमध्ये पुतिन बोलत होते. रशियन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऊर्जा तळांवरील युक्रेनच्या हल्ल्यामुळे दबाव निर्माण झाला आहे पण परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला. “आम्हाला समस्या कळतेय. त्या प्रॉब्लेमची कल्पना आहे. आम्ही त्यावर काम करतोय. आम्ही देश, बॉर्डर आणि नागरिक तिघांची सुरक्षितता सुनिश्चित करु” असं पुतिन म्हणाले.

“आमच्या भूभागावर होणारे दहशतवादी हल्ले, इन्फ्रास्ट्रक्चरवरील हल्ले आम्ही आज ज्या आव्हानांचा सामना करतोय त्यावर निश्चित मात करु. या बद्दल मनात कुठलीही शंका बाळगू नका” असं पुतिन बोलले. रशिया-युक्रेन युद्धाला आता चार वर्ष होत आली. हे युद्ध थांबवण्याचा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बराच प्रयत्न केला. पण अजूनही हे युद्ध सुरुच आहे. युक्रेनकडून आता लांब पल्ल्याचे खोलवर ड्रोन हल्ले सुरु आहेत. त्याची मोठी झळ रशियाला बसतेय. युक्रेनकडून रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलं जात आहे. ऊर्जा प्रकल्प हे रशियाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत.

युक्रेनचा रशियाच्या आत खोलवर हल्ले करण्याचा उद्देश काय?

यारोसाल्वी भागातील रशियाच्या दुसऱ्या तेल प्रकल्पाला लक्ष्य केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला. रशियाकडून लगचे या हल्ल्याची पृष्टी करण्यात आलेली नाही. युद्ध लढणाऱ्या रशियाला आर्थिक दृष्टया कमकुवत करणे हा मुख्य उद्देश असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की म्हणाले. युक्रेनकडून रशियाच्या लष्करी तळांबरोबर औद्योगिक आणि ऊर्जा तळांना लक्ष्य करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे रशिया बॅकफूटवर येऊन चर्चेसाठी तयार होईस असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांना वाटतं.

युक्रेन नाटोमध्ये सहभागी झाल्यास आपल्या सुरक्षेला धोका निर्माण होईल म्हणून पुतिन यांनी हे युद्ध सुरु केलं. त्यांना नाटो फौजा आपल्या सीमेजवळ नको आहेत. अमेरिका आणि नाटो म्हणजे युरोपियन देशांकडून मिळणारी जी रसद आहे, त्या बळावर युक्रेन अजूनही रशिया विरुद्ध लढत आहे.

Follow Us
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल