Putin India Visit : पुतिन यांच्या दौऱ्यात भारताचा फायदा काय? आपल्याला काय-काय मिळणार? भारतीयांना नोकरीची संधी कुठे मिळणार? जाणून घ्या
Putin India Visit : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. ते स्वाभाविक सुद्धा आहे. पण त्यांचा दौरा भारतासाठी खूप महत्वाचा आहे. कारण पुतिन यांच्या दौऱ्यातून आपल्याला काय-काय मिळणार? ते जाणून घ्या.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आज भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यावर अमेरिकेसह, युरोप, चीन आणि पाकिस्तान या देशांच लक्ष आहे. कारण रशिया आणि भारतामध्ये जे करार होतील, त्याचे दूरगामी परिणाम या देशांवर होऊ शकतात. म्हणून पुतिन यांचा भारत दौरा महत्वाचा आहे. दोन्ही देशांमध्ये क्रूड ऑइल करार, संरक्षण आणि मुक्त व्यापार करारावर (एफटीए) यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष संरक्षण करारावर असेल. सध्याची एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली, भविष्यातील एस-500 प्रणालीसाठी सहकार्य, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पुढील आवृत्ती आणि दोन्ही देशांच्या नौदलांसाठी एकत्रितपणे युद्धनौका बनवण्यासारख्या योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
रशिया भारताला स्वस्त कच्चे तेल विकत आहे, परंतु अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दबावामुळे पेमेंटमध्ये अडचणी येत आहेत. पुतिन यांच्या या भेटीत दोन्ही देश एक नवीन पेमेंट प्रणाली तयार करण्यावर सहमत होऊ शकतात, ज्यामुळे व्यापार अखंडितपणे सुरू राहील.यात रुपया-रुबल व्यापार, डिजिटल पेमेंट किंवा तिसऱ्या देशाच्या बँकेचा वापर यांसारख्या प्रणालींचा समावेश असू शकतो.
रशिया भारताला कुठे गुंतवणूकीची संधी देणार?
रशिया भारताला आर्कटिक प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीची संधी देखील देऊ शकतो, जिथे रशिया जगातील मोठे तेल-वायू साठे विकसित करत आहे. दोन्ही देशांमध्ये अंतराळ, अणुऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार आणि बंदरांच्या विकासावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत रशियाच्या मदतीने कुडनकुलम (तामिळनाडू) इथं अणुऊर्जा प्रकल्प चालवत आहे. या प्रकल्पाला पुढे नेण्याबाबतही चर्चा होऊ शकते.
भारतीयांना कुठे नोकरीची संधी मिळणार?
रशियामध्ये युद्धानंतर अनेक क्षेत्रांमध्ये कामगारांची कमतरता निर्माण झाली आहे. रशियाला भारतातून तांत्रिक तज्ज्ञ, वैद्यकीय कर्मचारी, अभियंता आणि इतर प्रशिक्षित कामगार काम करण्यासाठी यावेत. भारतासाठी ही एक मोठी संधी असू शकते, कारण यामुळे भारतीयांना परदेशात नोकरीच्या नवीन संधी मिळतील.
दोन्ही देशांमध्ये हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार
रशिया-युक्रेन युद्धानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा पहिला दौरा आहे. या चर्चेव्यतिरिक्त,राष्ट्राध्यक्ष पुतिन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील.रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसाठी भारताच्या राष्ट्रपती मेजवानीचे आयोजन करतील.
दरम्यान 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यापूर्वी 2021 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थिती लावली होती.
