Putin India Visit Schedule : पुतिन आज भारतात कधी पोहोचणार? सिक्योरिटीची व्यवस्था कशी असेल?
Putin India Visit Schedule : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आज भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची जगभरात चर्चा आहे. कारण पुतिन यांच्या भारत भेटीत होणाऱ्या निर्णयांचे जागतिक राजकारणात पडसाद उमटणार आहेत. पुतिन यांच्या संपूर्ण भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाणून घ्या.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून पुतिन 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात येणार आहेत.या दौऱ्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वार्षिक शिखर परिषदेत चर्चा करतील. यासोबतच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेतील. पुतिन यांच्या दौऱ्यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात म्हटलं आहे की, “रशियन राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांना द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेण्याची, ‘विशेष धोरणात्मक भागीदारी’ मजबूत करण्यासाठी दृष्टिकोन निश्चित करण्याची संधी मिळेल तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी दोन्ही देशांना मिळेल”
पुतिन आज भारतात कधी पोहोचणार?
4 डिसेंबर
व्लादिमिर पुतिन आज संध्याकाळी 6:30 वाजता दिल्लीत पोहोचण्याची अपेक्षा.
संध्याकाळी 7:45 वाजता पुतिन पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या लोक कल्याण मार्गावर पोहोचतील.
संध्याकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भोजन करण्याची शक्यता
5 डिसेंबर
पुतिन यांचे सकाळी 9 वाजता राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत होणार.
सकाळी 10 वाजता पुतिन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटवर पोहोचतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात सकाळी 11 वाजता हैदराबाद हाऊस इथ वार्षिक शिखर परिषद पार पडेल.
दुपारी 1:15 वाजता दोन्ही देशांच संयुक्त निवेदन सादर होईल
दुपारी 2:30 वाजता भारत मंडपम इथ भारत-रशिया फोरमची बैठक
संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीकडून पाहुण्यांसाठी मेजवानीच आयोजन
रात्री 9 वाजता पुतीन रशियाला रवाना होतील
सुरक्षा व्यवस्था कशी असेल?
रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दोनदिवसीय भारत दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.पुतीन यांच्यासाठी पाचस्तरीय सुरक्षा कवच तयार करण्यात आलं आहे. त्यात राष्ट्रीय सुरक्षा दलाचे टॉप कमांडर, स्नायपर, ड्रोन, जॅमर आणि ‘एआय’च्या माध्यमातून देखरेख करणारी यंत्रणा यांचा समावेश आहे. ज्या मार्गावरून पुतीन यांचा ताफा जाईल त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. पुतिन त्यांच्या सुरक्षेबाबत प्रचंड सजग असतात.
