AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मुस्लीम देशाची भारतासह 40 देशांच्या चिकन- अंड्यांवर बंदी, काय आहे कारण ?

मध्य पूर्वेतील या मुस्लीम देशाने भारतासह ४० देशांच्या कोंबड्या आणि अंड्यांच्या आयातीवर निर्बंध लादले आहे. आरोग्य संदर्भातील काळजीतून ही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे.

या मुस्लीम देशाची भारतासह 40 देशांच्या चिकन- अंड्यांवर बंदी, काय आहे कारण ?
egg ( file photo )
| Updated on: Feb 26, 2026 | 5:20 PM
Share

सौदी अरबने भारतासह ४० देशांच्या पोल्ट्री प्रोडक्टवर म्हणजे चिकन आणि अंड्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सौदी फूड एण्ड ड्रग अथोरिटी ( SFDA ) ने या संदर्भात आदेश जारी केले आहेत. या निर्बंधात भारताचा देखील समावेश आहे. हे पाऊन सौदीतील जनतेच्या काळजीसाठी उचलण्यात आले आहे. देशाच्या बाजारात खाद्य सुरक्षे मानकांना मजबूत करण्यासाठी सुरक्षा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बातमीनुसार SFDAने म्हटले आहे की ही लिस्ट वेळोवेळी जागतिक आरोग्य परिस्थितीनुसार बदलली जाऊ शकते.

काही देशांवर सौदी अरबमध्ये 2004 पासून निर्बंध लागलेले आहेत. तर अन्य काही देशांचा समावेश नंतर करण्यात आला आहे. हा निर्णय जोखीमचे आकन आणि आंतरराष्ट्रीय अहवालांच्या आधारे घेण्यात आला आहे. खास करुन बर्ड फ्लु ( एव्हीयन इन्फ्लुएंझा ) सारख्या आजारांचा प्रकोप पाहून घेण्यात आला आहे. Gulf News च्या वृत्तानुसार आयात सूचीत केलेले संशोधन अलिकडच्या वर्षातील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक मानले जात आहे.

भारतासहित 40 देशांवर निर्बंध

ज्या 40 देशांच्या पोल्ट्री उत्पादनांवर निर्बंध लादलेले आहेत. त्यात भारतासह अफगाणिस्तान, अझरबैझान, जर्मनी, इंडोनेशिया, इराण, बोस्निया आणि हर्जेगोव्हीना, बुल्गारिया, बांग्लादेश, तैवान, जिबूती, दक्षिण आफ्रीका, चीन, इराक, घाणा, पॅलेस्टाईन, व्हियतनाम, कंबोडिया, कजाकिस्तान, कॅमरून, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, लाओस, लीबिया, म्यानमार, यूनायटेड किंगडम, इजिप्त, मेक्सिको, मंगोलिया, नेपाल, नायझर, नायजेरिया, हाँगकाँग, जपान, बुर्किना फासो, सूदान, सर्बिया, स्लोव्हेनिया, आयव्हरी कोस्ट आणि मोंटेनग्रो यांचा समावेश आहे.

DGCIS च्या आकड्यांनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात भारताची पोल्ट्री निर्यात दुप्पटीहून जास्त वाढून सुमारे 149 मिलियन डॉलरवर पोहचली आहे.याचे मुख्य कारण मध्य पूर्वेतील देशातील अंड्यांना असलेली मागणी राहिली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अंडी आणि अंड्यांच्या उत्पादने उदा. पोल्ट्र समानाची निर्यात 71.16 मिलियन डॉलर होती. रुपयांत मोजायचे झाले तर पहिल्या सहामाहीत पोल्ट्री निर्यात 1,288.63 कोटी रुपये होती.संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि ओमान सारख्या देशातून मजबूत मागणीमुळे भारतात पोल्ट्री निर्यातीत वाढ झाली आहे.ओमान देखील भारतीय अंड्यांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.परंतू यास वर्षी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात UAE ने ओमानला मागे टाकत तो सर्वात मोठा खरेदीदार बनला आहे.

16 देशावर अंशत: निर्बंध

अंशत: निर्बंध असलेल्या देशात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इटली, बेल्जियम, भूतान, पोलँड, टोगो, डेन्मार्क, रोमानिया, झिम्बाब्वे, फ्रान्स, फिलीपाईन्स कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रिया आणि कांगो लोकतांत्रिक गणराज्य सामील आहे. या देशांच्या काही भागांवर बंदी घातली आहे.

बंदी का घातली?

जर पोल्ट्री मांस किंवा संबंधित उत्पादनात न्यूकॅसल रोग विषाणू नष्ट करण्यासाठी पुरेशी उष्णता किंवा प्रक्रिया केली गेली असेल तर त्यांना तात्पुरत्या बंदीतून सूट मिळू शकते असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी उत्पादनासोबत देशाच्या अधिकृत आरोग्य संस्थेचे योग्य प्रक्रियेची पुष्टी करणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शिवाय, उत्पादन मान्यताप्राप्त कारखान्यातून आले पाहिजे असेही म्हटले आहे

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...