AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाला मानलं राव, यालाच म्हणतात बाप माणूस, मोठा डाव, थेट जवळच्या मित्राला आश्रय देत..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाहीये. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले अधिक घातक होतील, असे सांगितले. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला असून हा धक्का साैदीने त्यांना दिलाय.

रशियाला मानलं राव, यालाच म्हणतात बाप माणूस, मोठा डाव, थेट जवळच्या मित्राला आश्रय देत..
Vladimir Putin
| Updated on: Apr 03, 2026 | 8:55 AM
Share

इराण अमेरिका युद्धात आखाती देश भरडले जात आहेत. सर्व जग संकटात आहेत. आता मध्य पूर्वेतील या युद्धामुळे संपूर्ण समीकरणे बदलताना दिसत आहेत. सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील फोन संभाषणाने जागतिक राजकारणात नवीन संकेत दिले आहेत. सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाली. प्रिंस मोहम्मद बिन सलमान आणि पुतिन यांच्यात अशावेळी चर्चा होत आहे, ज्यावेळी मध्य पूर्वेमध्ये युद्ध भडकले आहे. पुतिन आणि सलमान यांच्यातील फोनवरील चर्चेमुळे जागतिक राजकारणात नवीन संकेत मिळताना स्पष्टपणे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता हा मोठा धक्का म्हणावा लागेल.

सध्या साैदी आणि अमेरिका यांचे नाते तणावात आहे. यादरम्यानच साैदीच्या प्रिंसने थेट पुतिन यांना फोन केला. अमेरिकेने आपल्या स्वार्थासाठी आखाती देशांना संकटात टाकल्याचे आरोप त्यांच्याकडून सतत केला जात आहे. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भर मंचावर साैदीचे प्रिंस यांच्याबद्दल धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एकप्रकारे संकेत दिले होते की, साैदीचे नेतृत्व त्यांच्या दबावाखाली आहे आणि त्यांना चांगला व्यवहार करावा लागेल. त्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. त्यावेळी साैदीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावर भाष्य करणे टाळले होते. आता जागतिक राजकारणात बदलाचे थेटपणे संकेत त्यांनी दिले. फक्त संकेतच नाही तर पुतिन यांना फोन करून काहीवेळ त्यांनी चर्चा केली.

पुतिन या संधीचा फायदा घेणार हे तर स्पष्ट आहे. अमेरिकेकडून सतत रशियावर आरोप केला जात आहे की, रशिया युद्धात इराणला मदत करत आहे. त्यामध्येच आता साैदीने थेट पुतिन यांच्यासोबत संपर्क केला. साैदीच्या या पावलाने डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून डोनाल्ड ट्रम्प  यांच्याकडून रशियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. इराणसोबतच्या युद्धामुळे जगातील अनेक देश त्यांच्यावर संतापलेले आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा