हज यात्रेबाबत सौदी अरबने घेतला मोठा निर्णय, १४ देशांचे व्हीसा नियम बदलले, आता लहान मुलांना…

सौदी अरेबियाने १४ देशांसाठी १ वर्षाचा बहु-प्रवेश व्हीसा अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. या देशांतील लोक आता सिंगल-एंट्री व्हिसासाठी अर्ज करू शकतात.

हज यात्रेबाबत सौदी अरबने घेतला मोठा निर्णय, १४ देशांचे व्हीसा नियम बदलले, आता लहान  मुलांना...
| Updated on: Feb 10, 2025 | 5:59 PM

Saudi Arabia Ban on children’s Hajj pilgrimage: मुस्लीमांसाठी सर्वात पवित्र असलेल्या हज यात्रे संदर्भात सौदी अरबने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळ्या चेंगराचेंगरीची घटना पाहाता आता हजयात्रेवर देखील काही निर्बंध लादण्यात आले आहेत. आता यापुढे हजयात्रेत लहान मुलांवर बंदी घातल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयालच्यावतीने हा निर्णय घेतला आहे. हज यात्रेला दरवर्षी वाढणारी गर्दी पाहून आता लहान मुलांवर हजयात्रेवर बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

साल २०२५ मध्ये हजयात्रेसाठी त्याच लोकांना प्राधान्य दिले जाईल जे पहिल्यांदा हज यात्रेवर चालले आहेत. लहान मुलांवरील बंदी मागे लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणांपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.हज यात्रा २०२५ साठीचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे असे सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयालच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Nusuk app द्वारे रजिस्ट्रेशन होणार

सौदी अरबचे नागरिक आणि येथे राहणारे आता हज यात्रेसाठी Nusuk app एपद्वारे आपली नोंदणी करु शकतात. त्यांना या अधिकृत पोर्टलद्वारे नोंदणी करता येईल. अर्जदारांना स्वत:ची माहिती यात भरावी लागेल तसे स्वत: सोबत प्रवास करणाऱ्यांची माहिती देखील भरावी लागेल.

कोण-कोणत्या देशांवर परिणाम –

सौदी अरबच्या नवीन व्हीसा नियमांनुसार अल्जेरिया, बांगलादेश, इजिप्त, इथोपिया, भारत, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, मोरक्को, नाइजेरिया, पाकिस्तान, सूदान, ट्यूनीशिया आणि यमन यादेशांच्या व्हीसा नियमात बदल केले आहेत.

सौदी अरब सरकारने या देशांबरोबरच्या पर्यटन, व्यापार आणि कौटुंबिक प्रवासासाठीच्या बहु – प्रवेश व्हीसांना अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. आता नव्या नियमांनुसार या देशाचे नागरिक आता ते केवळ एकल प्रवेश व्हीसासाठीच अर्ज करु शकतात, जो केवळ तीस दिवसांसाठी व्हॅलिड आहे.

सौदी अरब हज आणि उमरा संदर्भात आपले नियमात बदल करीत असतो. २०२४ मध्ये सौदी अरबमध्ये उमरा दरम्यान ग्रेट ग्रँड मस्जिद जवळ गर्दी झाल्याने लोकांनी फोटोग्राफीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.