
Old City In Water : अंतराळात अशी काही रहस्ये आहेत, ज्याचा छडा अजूनही लागलेला नाही. वैज्ञानिक अंतराळातील अनेक गूढ गोष्टींमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत. पृथ्वीवर असलेल्या समुद्र, सरोवर, तळ्यांमध्ये अशाच अनेक रहस्यमयी वस्तू आहेत. समुद्र, सरोवरात काही प्राणी असे आहेत, जे कोणीच कधीही पाहिलेले नाहीत. ते दिसताच शास्त्रज्ञही थक्क होतात. आता अशाच एका सरोवरात संपूर्ण जगाला थक्क करणारी एक अजब गोष्ट सापडली आहे. सरोवरातील हे दृश्य पाहून शास्त्रज्ञही अवाक झाले आहेत. पाण्यातील ही दुसरी दुनिया तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सामान्यांच्या कल्पनेच्या पुढे असणारा एक शोध लागला आहे. शास्त्रज्ञांना किर्गिजस्तानमध्ये एका सरोवरात तब्बल 600 वर्षांपासून लपून राहिलेलं एक रहस्य सापडलेलं आहे. शास्त्रज्ञांना सरोवरात चक्क एक गाव सापडलं आहे. विशेष म्हणजे हे शहर ईट, स्मशानभूमी, मातीची काही भांडी सापडली आहे. हे सारे दृश्य पाहून शास्त्रज्ञांना पाण्यात दुसरी दुनियात नाही ना? असे उत्सुकतेने विचारले जात आहे. ज्या ठिकाणी सरोवरात हे शहर सापडलेले आहे, त्याला मध्ययुगीन काळात विशेष महत्त्व होते. पूर्व तसेच पश्चिमेकडील व्यापारी याच मार्गावरून जात होते. या सरोवरातील एक ते चार मीटर खोल पाण्यात वेगवेगळ्या चार भागांत या शहराचे अवशेष सापडले आहेत.
रशियन जिओग्राफिकल सोसायटीने या शोधात सापडलेल्या शहराबाबत सविस्तर माहिती दिली आहे. हे शहर 15 व्या शतकात अस्तित्त्वात होते. मोठा भूकंप आल्यानंतर हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्यानंतर एका सरोवराने या शहराला पूर्णपणे गिळंकृत केले. त्यानंतर पुढच्या पिढ्या या शहराला विसरून गेल्या, असे रशियन जिओग्राफिकल सोसायटीने सांगितले आहे. वैज्ञानिकांना या शोधामध्ये 13-14 व्या शतकातील मुस्लीम धर्मीयांची स्मशानभूमी सापडलेली आहे. याच भागात एक स्त्री आणि एका पुरुषाचा सांगाडाही सापडला आहे. आता या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, शास्त्रज्ञांना हा शोध लागल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता या शोधात आणखी को-कोणत्या बाबी समोर येणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.